

INS Mahe
ESakal
मुंबई : भारतीय नौदलाच्या तटीय सुरक्षेला नवे बळ देणारी आणि पाणबुडीविरोधी कारवायांसाठी खास तयार केलेली स्वदेशी शैलो वॉटर क्राफ्ट आयएनएस माहे सोमवारी (ता. २४) मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथे नौदलात दाखल झाली. पश्चिम नौदल कमांडतर्फे आयोजित समारंभात लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली या युद्धनौकेचे कमिशनिंग करण्यात आले.