

INS Nipun
ESakal
नितीन बिनेकर
मुंबई : खोल समुद्रातील डायव्हिंग, पाण्याखालील हस्तक्षेप आणि पाणबुडी बचाव मोहिमांसाठी भारतीय नौदलाच्या क्षमतेत सोमवारी महत्त्वाची भर पडली. ‘आयएनएस निपुण’ या ‘निस्तार’ श्रेणीतील दुसऱ्या डायव्हिंग सपोर्ट व्हेसलचे (डीएसव्ही) मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथे कमिशनिंग करण्यात आले. नौदलप्रमुख अॅडमिरल कृष्ण स्वामिनाथन यांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यास पश्चिम नौदल कमांडचे प्रमुख व्हाइस अॅडमिरल संजय वात्सायन यांच्यासह नौदलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.