esakal | सोनू सूद संबंधित सहा ठिकाणी प्राप्तीकर खात्याची पहाणी
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

सोनू सूद संबंधित सहा ठिकाणी प्राप्तीकर खात्याची पहाणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : अभिनेता (Actor) सोनू सूद (Sonu Sood) याच्याशी संबंधित सहा ठिकाणी आज प्राप्तीकर खात्याने पहाणी केली. विशेष म्हणजे कालच दिल्लीचे मुख्यमंत्री (CM) अरविंद केजरीवाल Arvind Kejriwal यांनी सोनू (Sonu Sood) यास आपल्या एका कार्यक्रमाचा ब्रँड अँबेसेडर (Brand Ambassador) घोषित केले होते.

सोनू सूद याने अद्याप कोणाही राजकीय पक्षाशी संबंध दाखवला नाही. तरीही केजरीवाल यांच्या भेटीनंतर तो पुढीलवर्षी होणाऱ्या पंजाबमधील निवडणुका लढवेल, अशीही चर्चा आहे. प्राप्तीकर खात्याच्या आजच्या पहाणीत त्याचे घर तसेच त्याच्या सहा कार्यालयांचा समावेश आहे. कोरोना साथीदरम्यान सोनू सूद याने सामान्य लोकांना मोठ्या प्रमाणावर मदत केल्याने त्याचे मोठ्या प्रमाणावर कौतुक झाले होते.

कराचा भरणा न केल्याप्रकरणी प्राप्तीकर खात्याने आज सोनूच्या मुंबई व अन्य शहरांमधील कार्यालयांची पहाणी केली. मुंबई आणि लखनौ मधील कार्यालयांची पहाणी झाल्याचे सांगण्यात येत आहे. सोनू ची कंपनी व लखनौ मधील रिअल इस्टेट फर्म यांच्यात झालेल्या एका व्यवहाराची तपासणी झाल्याचेही सांगितले जात आहे.

हेही वाचा: अंकिताने अनिरुद्धला सगळे खरे सांगितले!;पाहा व्हिडिओ

सोनू सूद याने मागीलवर्षीच्या कोविड लॉकडाऊनमध्ये स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरी जाण्यास मोठीच मदत केली होती. मजुरांना त्यांच्या गावी पोहोचण्यासाठी विमानाची तिकीटे देणे, वाहनांची व्यवस्था करणे, अन्य गरजूंना जेवण-शिधा, औषधे इतकेच नव्हे तर वेगवेगळ्या प्रकारे ऑक्सिजन देखील त्याने पुरवला होता. अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री असलेल्या दिल्ली राज्याने त्याला एका समाजोपयोगी कार्यक्रमासाठी आप सरकारचा ब्रँड अँबेसेडर घोषित केले आहे. त्यानुसार सोनू सूद विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीसाठी मार्गदर्शन करीत आहे.

loading image
go to top