Mumbai : रील मास्टरने पोलिसांची मागितली माफी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai police

Mumbai : रील मास्टरने पोलिसांची मागितली माफी

डोंबिवली : चोळेगाव येथे राहणाऱ्या सुरेंद्र पाटील याने मानपाडा पोलिस ठाण्यात अधिकाऱ्यांच्या खूर्चीवर बसून रील बनवला. हे रील इन्स्टाग्रामवर व्हायरल झाल्यानंतर त्याला प्रसिद्धी मिळाली, परंतू या प्रसिद्धीच्या मोहापायी त्याला जेलची हवा खावी लागली आहे. याच रील मास्टर सुरेंद्र ने मानपाडा पोलिसांची माफी मागितली असून हा नविन व्हिडीओ आता त्याचा व्हायरल होत आहे.

ठाकुर्ली परिसरात राहणारा बांधकाम व्यावसायिक सुरेंद्र पाटील उर्फ चौधरी हा मानपाडा पोलिस ठाण्यात फसवणूक प्रकरणातील आपली रक्कम आणण्यासाठी गेला होता. यावेळी पोलिसांच्या खूर्चीवर बसून रील बनविण्याचा त्याला मोह झाला आणि कार्यालयात कोणी अधिकारी नसताना त्याने रील बनविले.

हे रील इन्स्टाग्राम अकाऊंटवर प्रचंड व्हायरल झाले. मानपाडा पोलिसांना याची माहिती मिळताच सुरेंद्र याच्या विरोधात गुन्हा दाखल करीत मानपाडा पोलिसांनी त्याला अटक केली होती. कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने त्याला 4 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. रील बनवून तो प्रसिद्ध झाला, परंतू या प्रसिद्धीच्या मोहापायी त्याला जेलची हवा खायला लागली आहे.

यानंतर सुरेंद्रचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये सुरेंद्र याने कार्यालयात कोणी पोलीस कर्मचारी नसताना आपण व्हिडीओ बनविला आहे. माझ्याकडून ही चूक झाली आहे. महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करण्याचा माझा हेतू नव्हता. माझी चूक झाल्याचे मी मान्य करतो असे सुरेंद्रने या व्हिडीओ मध्ये म्हटले आहे. हा व्हिडीओ देखील प्रचंड व्हायरल होत आहे.