विमा सुरक्षेची दहीहंडी

विमा सुरक्षेची दहीहंडी

मुंबई - यंदाच्या वर्षी ६४१ गोविंदा पथकांनी विमा कवच घेतले आहे. त्यामध्ये २२८ गोविंदा पथकांनी स्वतंत्र विमा उतरवला आहे. ३१ ऑगस्ट विम्याचा लाभ घेण्याचा शेवट दिवस होता. यंदाच्या वर्षी गोविंदा पथकांनी विमा सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यांनी अधिक विमा सुरक्षेचा लाभ घेतला आहे. मागील वर्षी ३८९ पथकांनी विमा काढला होता. यंदा जादा अडीचशे गोविंदा पथकांची त्यामध्ये भर पडली आहे. 

प्रत्येक मंडळातील ५० ते ७० गोविंदांचा विमा उतरवला जातो. लक्षणीय बाब म्हणजे २२८ गोविंदा पथकांनी स्वतंत्र विमा उतरवला आहे, अशी माहिती इंडियन ओरिएंटल असोसिएशनचे सचिन खालविलकर यांनी दिली. भाजपने १३२ आणि शिवसेनेने १२० गोविंदा पथकांच्या विम्यासाठी प्रायोजकत्व दिले आहे. साई सेवा मेडिकल ट्रस्ट ४५, सीतीबेन शाह ट्रस्ट ५२, जनता जागृती मंच २३ आणि रेडबुलने ४१ पथकांना प्रायोजकत्व दिले आहे. पथकांना १० लाखांचे विमा कवच देण्यात आले आहे. जास्तीत जास्त पथकांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी विम्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन समन्वय समितीने केले होते. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला, असे मत दहीहंडी उत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष बाळा पडेलकर यांनी व्यक्त केले.  

आयोजक गोविंदांच्या सुरक्षेच्या नियमांची नेहमीच पायमल्ली करत आले आहेत. यंदा तर उंचीवर निर्बंध नाही. त्यामुळे ठिकठिकाणी थरांची स्पर्धा पाहण्यास मिळेल. त्यासाठी आयोजक सुरक्षेचे नियम किती पाळतात हे पाहण्यासाठी स्वाती पाटील यांच्या सामाजिक संस्थेचा  वॉच असेल. जे आयोजक गोविंदाच्या सुरक्षेच्या नियमांचे पालन करणार नाहीत, त्यांची दहीहंडीच्याच दिवशी पोलिसात तक्रार केली जाईल, अशी माहिती याचिकाकर्ती स्वाती पाटील यांनी दिली.

सामाजिक संस्थेचा वॉच
यंदाच्या वर्षी मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यामध्ये होणाऱ्या दहीहंडी आयोजनावर स्वाती पाटील यांच्या सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते वॉच ठेवणार आहेत. आयोजक गोविंदाच्या सुरक्षेसाठी दिलेल्या उच्च न्यायालयाच्या निकषांची अंमलबजावणी करत आहे की नाही, याची तपासणी आणि नोंद कार्यकर्ते करतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com