esakal | एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर ईंटक आक्रमक
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर ईंटक आक्रमक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ठाणे : एसटी (ST) कर्मचाऱ्यांची रखडलेली वार्षिक वेतन वाढ त्वरीत देण्यात यावी, ठाणे (Thane) विभागातील चालक(Driver), वाहक, यांत्रिकांच्या विश्रांती व स्वच्छतागृहांची झालेली दुरवस्था सुधारावी, एसटी प्रशासनाने कर्मचाऱ्यांची कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाची व्यवस्था करावी आदी प्रश्नांवर महाराष्ट्र एसटी (ST) वर्कर्स काँग्रेस (Congress) ईंटकचे (ETK) आक्रमक झाली आहे. ठाणे विभागीय अध्यक्ष सचिन शिंदे (Sachin Shinde) यांनी एसटी(St) कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर मार्गी न लावल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

हेही वाचा: ठाण्यातील अधिकाऱ्यावर भ्याड हल्ला; वाईत कर्मचाऱ्यांचे आंदोलन

दरम्यान, कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होत नाही. त्यात गणेशोत्सव तोंडावर आला असून, वेतन वेळेवर न झाल्यास एसटी वाहतुकीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जुलै व ऑगस्ट महिन्याचे वेतन प्रशासनाने त्वरीत द्यावे, अशी मागणी एसटी ईंटकने वरिष्ठ पातळीवरही केली आहे.

विभाग नियंत्रकांनी कर्मचाऱ्यांच्या या प्रलंबित प्रश्नांची गांभीर्याने दखल घेऊन ते लवकरात लवकर सोडवावेत, अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा शिंदे यांनी दिला आहे.

loading image
go to top