esakal | गुप्तचर विभागाच्या कोणत्या रिपोर्टमुळे महाविकास आघाडीच्या चेहऱ्यावर उमटलं स्मितहास्य ?
sakal

बोलून बातमी शोधा

गुप्तचर विभागाच्या कोणत्या रिपोर्टमुळे महाविकास आघाडीच्या चेहऱ्यावर उमटलं स्मितहास्य ?

एकीकडे विरोधक वारंवार पुढील काही काळात सरकार पडणारअसल्याची विधाने करतायत. तर दुसरीकडे गुप्तचर विभागाने दिलेल्या अहवालात वेगळी परिस्थिती पाहायला मिळतेय.

गुप्तचर विभागाच्या कोणत्या रिपोर्टमुळे महाविकास आघाडीच्या चेहऱ्यावर उमटलं स्मितहास्य ?

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : कोरोनामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्यात. अशात २०२१ हे वर्ष निवडणुकांचं असणार आहे. यामुळे पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे सर्वच पक्ष निवडणुकीआधीच्या तयारीला लागलेत. या पार्श्वभूमीवर गुप्तचर विभागाने महाविकास आघाडीसाठी एक दिलासादायक बातमी दिली आहे. आगामी काळात निवडणूक झाल्यात तर त्याचा फायदा तीन पक्ष असलेल्या महाविकास आघाडीला होईल असा अहवाल दिलाय. गुप्तचर विभागाने याबाबतचा एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार येत्या महापालिका निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला यश मिळेल असा अंदाज बांधलाय. एका मराठी वृत्तवाहिनीने याबाबत माहिती दिली आहे. गुप्तचर विभागाच्या या अहवालामुळे महाविकास आघाडीच्या चेहऱ्यावर स्मितहास्य नक्कीच उमटलं असेल असं राजकीय विश्लेषक म्हणतायत. 

महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांना फायदा फक्त मोदी सरकारच्या काळातच झाला का? संजय राऊत यांचे भाजपवर टीकास्त्र

येत्या काळात ग्रामपंचायतींच्या निवडणुका आहेत. तब्ब्ल चौदा हजार ग्रामपंचायतींच्या निवडणूक आणि त्यानंतर काही महत्त्वाच्या महापालिकांच्या देखील निवडणुका आहेत. यामध्ये देशाची आर्थिक राजधानी मुंबई महापालिकेची देखील निवडणूक आहे. या सोबतच ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, कल्याण डोंबिवली, औरंगाबाद, कोल्हापूर निवडणुका लागणार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीने एकत्रित निवडणूक लढवत भारतीय जनता पक्षाला धोबीपछाड दिला होता. सहापैकी पाच जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळवला होता. 

मुंबई परिसरातील बातम्यांसाठी येथे क्लिक करा

एकीकडे विरोधक वारंवार पुढील काही काळात सरकार पडणारअसल्याची विधाने करतायत. तर दुसरीकडे गुप्तचर विभागाने दिलेल्या अहवालात वेगळी परिस्थिती पाहायला मिळतेय.

intelligence report mahavikas aaghadi local body elections exclusive report

loading image