गुटख्याची वाहतूक करणारी आंतरराज्य टोळी अटकेत, 6 लाखांचा  गुटखा जप्त

गुटख्याची वाहतूक करणारी आंतरराज्य टोळी अटकेत, 6 लाखांचा  गुटखा जप्त

मुंबईः  परराज्यातून चोरट्या मार्गाने गुटखा आणून तो मुंबई शहरात विक्री करणाऱ्या आंतरराज्य टोळीला गुन्हे शाखा युनिट-2 च्या पथकाने अटक केली आहे. या कारवाईत गुन्हे शाखेने  6 लाख 68 हजार रुपये किंमतीचा गुटखा तसेच गुटख्याची चोरट्या मार्गाने वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेला टेम्पो आणि लग्झरी बस जप्त केली आहे.

महाराष्ट्र राज्यात बंदी असलेला गुटखा पर राज्यातून चोरट्या मार्गाने आणून तो मुंबई शहरात विक्री करणारी आंतरराज्य टोळी सक्रिय असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट-2 च्या पथकाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे, अपर पोलिस आयुक्त गुन्हे डॉ.बी.जी. शेखर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-2 च्या पथकाने वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीधर गोरे यांचे नेतृत्वाखाली गुरुवारी सकाळी 9 च्या सुमारास सुमारास पनवेल येथील गार्डन हॉटेल समोरील रस्त्यावर सापळा लावला होता.

या दरम्यान, गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबईच्या दिशेने जाणार टाटा टेम्पो अडवून त्याची तपासणी केली असता, सदर टॅम्पोमध्ये तब्बल 6 लाख 68 हजार रुपये किंमतीचा विमल, राजश्री या कंपनीचा गुटख्याचा साठा आढळून आला. त्यामुळे पोलिसांनी गुटख्याचा साठा जप्त करून टेम्पो चालक राज रामा साळुखे (38) याला टेम्पोसह ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, सदरचा गुटखा हा मध्यप्रदेश मधील इंदोर येथुन प्रवासी लग्झरी ट्रॅव्हल्स बसमधून आणण्यात आल्याची माहिती दिली. त्यानुसार गुन्हे शाखेने मध्य प्रदेश मधील रॉयलस्टार ट्रॅव्हर्स अॅन्ड टुर्सची लगझरी बस जप्त करून बस चालक अशपाक कालु खा (32) याला अटक केली. त्यानंतर पोलिसांनी अधिक चौकशी करून गुटखा घेणाऱ्या इरशाद सैजुद्दीन अन्सारी (32) याला देखील अटक केली. या कारवाईत अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपी विरोधात पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

--------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Inter state gang transporting gutka arrested 6 lakh gutka seized

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com