नवी मुंबईतील अंतर्गत रस्त्यांची चाळण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 ऑगस्ट 2019

ऐरोली येथील सेक्‍टर ५,१६, दिवा सर्कल, घणसोलीमधील रबाळे, गोठिवली, तळवली, नोसीलनाका, जिजामाता नगर ते घरोंदादरम्यानचा रस्ता, तर तुर्भे येथील तुर्भे नाका तसेच नेरूळ, तुर्भे, पावणे, महापे एमआयडीसीमधील सेवा रोडची चाळण झाली असून, रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

मुंबई : नवी मुंबई शहरातील अनेक अंतर्गत रस्ते दर्जेदार बनवण्यात न आल्याने या रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यामुळे नागरिकांबरोबरच वाहनचालकांचीही चांगलीच दमछाक होत असल्याने आधुनिक शहर ते हेच का? अशी म्हणण्याची वेळ नवी मुंबईकरावर आली आहे. 

ऐरोली येथील सेक्‍टर ५,१६, दिवा सर्कल, घणसोलीमधील रबाळे, गोठिवली, तळवली, नोसीलनाका, जिजामाता नगर ते घरोंदादरम्यानचा रस्ता, तर तुर्भे येथील तुर्भे नाका तसेच नेरूळ, तुर्भे, पावणे, महापे एमआयडीसीमधील सेवा रोडची चाळण झाली असून, रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे यातील काही रस्त्यां पावसाळ्याच्या तोंडावर डांबरीकरण केले आहे. तरीही हे रस्ते उखडले आहेत. यामुळे वाहनचालकांसह नागरिकांना खड्ड्यातील रस्त्यांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. 

बुधवारी (ता.३१) मनपाच्या वतीने घणसोली येथील जिजामाता नगर परिसरातील रस्त्यातील खड्डे भरण्याचे काम करण्यात आले. खड्डे भरताना योग्य प्रकारे साहित्य न टाकल्याने फक्त थुकपट्टी केली आहे. याबाबत शहर अभियंता सुरेंद्र पाटील यांना विचारले असता, पावसाचा जोर कमी झाला की तत्काळ रस्त्यांची डागडुजी करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

स्त्यांची निर्मिती करताना दर्जेदार साहित्य वापरले जात नसल्याने दरवर्षी रस्त्याचा पुनर्विकास करावा लागतो. त्यामुळे मनपाच्या तिजोरीत सर्वसामान्य नागरिकांकडून आलेली कोट्यवधी रुपयांची गंगाजळ नाहक रस्त्यांवर खर्ची पडत आहे. त्यामुळे अभियांत्रिकी विभागाने यावर योग्य विचार करावा. 
- सचिन शेलार, अध्यक्ष, माणुसकी युथ ग्रुप.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Internal Road pits in Navi Mumbai