International Childhood Cancer Day: लहान मुलांच्या कर्करोगात वाढ

भाग्यश्री भुवड
Monday, 15 February 2021

लहान मुलांच्या कर्करोगात वाढ होत असल्याचे समोर आले आहे. जगभरात हे प्रमाण वाढत असून मुंबईतही बरेच रुग्ण सापडत आहेत.

मुंबई: लहान मुलांच्या कर्करोगात वाढ होत असल्याचे समोर आले आहे. जगभरात हे प्रमाण वाढत असून मुंबईतही बरेच रुग्ण सापडत आहेत.  महाराष्ट्रात बालपण कर्करोगाचे प्रमाण सुमारे 4 हजार ते 6,300 प्रकरणे इतके आहे. जे देशात उत्तर प्रदेश आणि बिहारनंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर, जगभरात 15 वर्षांखालील अंदाजे 2.5 लाख मुलं काही पेडियाट्रिक कर्करोगाने ग्रस्त होतात. यापैकी 80% पेक्षा जास्त प्रकरणे निम्न आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये आढळतात.  

भारतात दरवर्षी सुमारे 50-75 हजार केसेस होतात. दुर्दैवाने सर्व मुले पेडियाट्रिक कर्करोग उपचार सुविधांवर वेळीच पोहोचण्यास सक्षम नसतात आणि आजाराला बळी पडतात.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार, बालपणातील  कर्करोगाच्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे जिथे त्यांचा जन्म झाला आहे. निश्चितच, कर्करोगाने ग्रस्त असलेल्या मुलांच्या गरजा भागवण्यासाठी एक राष्ट्रीय योजना आणि मजबूत राजकीय बांधिलकी आवश्यक आहे जेणेकरून ते जगू शकतील.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या कर्करोगातून बरे झालेल्यांची संख्या जास्त आहे. ज्यांनी त्यांच्या सुरुवातीच्या जीवनात मोठ्या तणावाचा सामना केला  आहे. त्यांची भीती दूर करण्यासाठी काळजीपूर्वक मार्गदर्शन आणि पुनर्वसन आवश्यक आहे. 

यासाठी मसीना रुग्णालयाने आणि डॉ. ढाब्बर ऑनकॅर यांनी कॅनकिड्स संस्थेसोबत बालपण कर्करोग सर्व्हायव्हर क्लिनिक सुरू केले आहे. या क्लिनिकमध्ये, वैद्यकीय समस्यांव्यतिरिक्त, आम्ही सामाजिक कार्यकर्ते आणि मानसशास्त्रज्ञांच्या मदतीने मानसशास्त्रीय समस्यांची काळजी देखील घेणार आहोत. सीपीएए ही आणखी एक एनजीओ आहे, जी बालपण कर्करोगाने वाचलेल्यांच्या मानसिक समस्यांकडे लक्ष देण्यास मदत करत आहे आणि यासाठी आम्ही संशोधन प्रस्तावही पाठवला आहे जेणेकरून वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास केला जाऊ शकेल आणि वाचलेल्यांच्या सर्वांगीण आरोग्यासाठी शिफारसी करता येतील. 
डॉ. श्वेता बन्सल, कन्सल्टंट पेडियाट्रिक ऑन्कोलॉजिस्ट, बीएमटी फिजीशियन, मसीना रुग्णालय 

मुंबई आणि राज्यामध्ये संख्या किती ? 

महाराष्ट्रात बालपण कर्करोगाचे प्रमाण सुमारे 4,000-6300 प्रकरणे इतके आहे, जे देशात उत्तर प्रदेश आणि बिहारनंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे. 

हेही वाचा-  काय सांगता!  2030 पर्यंत मुंबई मलेरिया मुक्त?, महापालिकेचा आराखडा

कोणता कर्करोग लहान मुलांमध्ये जास्त होतो? 

मुलांमध्ये कर्करोग आढळणे हे प्रौढ व्यक्तीच्या शरीरात आढळलेल्या कर्करोगपेक्षा वेगळा असतो. मुलांमध्ये सर्वात सामान्य प्रकाराचे होणारे कर्करोग म्हणजे ब्लड कॅन्सर (ऍक्यूट ल्युकेमिया), ब्रेन ट्यूमर आणि लिम्फोमा हे आहेत.

--------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

International Childhood Cancer Day 2021 Increase in pediatric cancer


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: International Childhood Cancer Day 2021 Increase in pediatric cancer