

NMIA International Flights
ESakal
नवी मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील हवाई प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उद्यापासून (ता. १५) अधिकृतपणे आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सेवा आणि मालवाहतूक (कार्गो) सेवा सुरू होत आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये देशांतर्गत वाहतूक यशस्वीरीत्या सुरू झाल्यानंतर आता हे विमानतळ थेट परदेशी सेवांसाठी सज्ज झाले आहे.