Ganesh Naik : वाघ-बिबट्यांच्या शिकारीमागे आंतरराष्ट्रीय जाळे; वनमंत्री गणेश नाईक यांचा गौप्यस्फोट

मागील काही दिवसांपासून वाघ आणि बिबट्यांची शिकार करणाऱ्या टोळीचे संबंध थेट परदेशातील व्यक्तींशी.
Ganesh Naik

Ganesh Naik

sakal

Updated on

ठाणे - मागील काही दिवसांपासून वाघ आणि बिबट्यांची शिकार करणाऱ्या टोळीचे संबंध थेट परदेशातील व्यक्तींशी असल्याचा गौप्यस्फोट राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी गुरुवारी ठाण्यात केला. ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन येथे आयोजित जनता दरबारानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. तर, दुसरीकडे राज्यात बिबट्यांची संख्या मागील सात-आठ वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढल्याचे देखील नाईक यांनी यावेळी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com