५ तासांच्या चौकशीनंतर रियाला देण्यात आला २० मिनिटांचा ब्रेक, CBI ने विचारलेत 'हे' प्रश्न

५ तासांच्या चौकशीनंतर रियाला देण्यात आला २० मिनिटांचा ब्रेक, CBI ने विचारलेत 'हे' प्रश्न

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी सक्त वसुली संचलनालयानंतर (ईडी) आता केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) रिया चक्रवर्तीची  चौकशी केली. सीबीआय अधिकारी नुपुर प्रसाद यांच्यां नेतृत्वाखाली डीआरडीओच्या गेस्ट हाऊसवर रियाची चौकशी करण्यात आली.

रियाला चौकशीसाठी सीबीआयने समन्स बजाविल्यानंतर शुक्रवारी सकाळी रिया भाऊ शौविक चक्रवर्तीसह डीआरडीओ गेस्ट हाऊसवर दाखल झाली. मात्र रियाने यावेळी प्रसारमाध्यमांवर नाराजी व्यक्त केली. तसेच रियाने तीच्या कारच्या काचेवर देखील रागाने मारले. त्यानंतर रिया डीआरडीओ गेस्ट हाऊसवर पोहोचली. तेथे नोंदणी केल्यानंतर केली. तसेच तीचे सर्व साहीत्य जमा करीत त्याची यादी रियाकडे दिली.

त्यानंतर रियाला गेस्ट हाऊसमधील चौकशी करण्यात येणा-या खोलीत गेली. तेथे सीबीआय अधिकारी नुपुर प्रसाद, अनिल यादव यांनी रियाची चौकशी करण्यास सुरुवात केली. तब्बल पाच तास चौकशी केल्यानंतर तीला दिड वाजण्याच्या सुमारास 20 मिनिटांचा ब्रेक देण्यात आला. त्यानंतर पुन्हा तिची चौकशी करण्यास सुरुवात करण्यात आल्याचे सीबीआय अधिका-याने सांगितले.

यावेळी सुरुवातीला रियाचा जबाब नोंदवण्यात आला.  त्यानंतर तिच्यावर करण्यात आलेल्या आरोपांविषयी तिची चौकशी करण्यात आली.  सीबीआयचे पथक रिया आणि सुशांतबरोबर त्यांच्या घरामध्ये राहणा-या सर्वांची रियासमोर चौकशी करणार आहेत.

रियासाठी सीबीआयने विशेष प्रश्नावली तयार करण्यात आली होती. त्यात सुशांत पहिल्यांदा ओळख कधी झाली, दोघे एकमेकांच्या जवळ कधी आलात, सुशांतच्या घरी राहण्यासाठी केव्हापासून गेली होती, सुशांतबरोबर युरोप जाण्याची योजना कुणाची होती, तेथे भावाला का घेऊन गेलात, बुकींच्या आधी हॉटेल का सोडण्यात आले, शेवटच्या क्षणी युरोप टुअरची योजना का बदलली, किती डॉक्टरांनी सुशांतला तपासले आणि त्या डॉक्टरांची सविस्तर माहिती काय आहे, तुला कसे कळले की सुशांत नैराश्येत आहे, 8 जूनलाअसे काय झाले की तू अचानक घर सोडले,त्यानंतर सुशांतने तुझ्याशी किंवा तू सुशांतशी संपर्क केला होता का, असे प्रश्नांचा समावेश या प्रश्नावलीत होता.

सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) गौरव आर्य याला समन्स पाठवला आहे. गोव्यातील दि टॅमेरिंड इन अंजुना या हॉटेलबाहेर त्याबाबत नोटीस लावली आहे. या नोटीसनुसार त्याला 31 ऑगस्टपूर्वी ईडीसमोर हजर राहण्यास सांगितले आहे. 

( संकलन - सुमित बागुल ) 

interrogation of rhea chakraborty after 5 hours rhea got break of 20 minutes

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com