esakal | कुणाल कमराने घेतली संजय राऊत यांची मुलाखत; नेटकऱ्यांमध्ये कमालीची उत्सुकता
sakal

बोलून बातमी शोधा

कुणाल कमराने घेतली संजय राऊत यांची मुलाखत; नेटकऱ्यांमध्ये कमालीची उत्सुकता

स्टॅंडअप कॉमेडिएन कुणाल कमराने शिवसेना खासदार संजय संजय राऊत यांची मुलाखत घेतली आहे

कुणाल कमराने घेतली संजय राऊत यांची मुलाखत; नेटकऱ्यांमध्ये कमालीची उत्सुकता

sakal_logo
By
तुषार सोनवणे

मुंबई - स्टॅंडअप कॉमेडिएन कुणाल कमराने शिवसेना खासदार संजय संजय राऊत यांची मुलाखत घेतली आहे. मुंबईतील खार परिसरातील खासगी स्टुडिओत ही मुलाखत झाल्याची माहिती समोर आली आहे. दोघांनीही यासंबधीची माहिती आपआपल्या ट्विटर हॅंडलवरून दिली आहे.

कांजूरमार्गच्या जमिनीबाबत मुख्यमंत्री दिशाभूल करत आहेत; भाजप आमदाराची टीका

खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली. ते यापुढे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीसांचीही मुलाखत घेणार आहेत. परंतु मुलाखतकार संजय राऊत यांचीच मुलाखत स्टॅंडअप कॉमेडिएन कुणाल कमरा त्याच्या 'शट अप या कुणाल' या शोसाठी घेणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. कुणाल ने याआधी अनेक वेळा संजय राऊतांकडे वेळ मागितल्याची चर्चा होती. अखेर दोघांची भेट झाली आहे. कुणाल आणि राऊत यांनी या मुलाखतीसंदर्भात ट्विट केले आहे. तर कुणालने या ट्विटमधील फोटोमध्ये जेसीबी हातात घेतल्याचे दिसत आहे. त्यामुळे अभिनेत्री कंगना रानौतच्या मुद्द्यावरून राऊत यांना कुणालने कोणते प्रश्न विचारले याबाबत नेटकऱ्यांमध्ये उत्सुकता आहे.  

आरे आंदोलनातील पर्यावरणवाद्यांचे गुन्हे मागे घेण्यात येणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची माहिती - 

या मुलाखतीमध्ये सुशांतसिंह प्रकरणापासून ते बिहार निवडणूकांपर्यंत अनेक विषयांवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. संजय राऊत आणि कुणाल कमरा या  दोघांनी शेअर केलेला फोटो सध्या समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय ठरत आहे.  येत्या दोन आठवड्यात ही मुलाखत अंतिम स्वरूपात प्रसिद्ध होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.