कल्याण-डोंबिवलीतील 65 विकासकांचा तपास विशेष तपास पथकाकडे

कल्याण-डोंबिवली बेकायदा बांधकामांचे पेव फुटले असून याप्रकरणी बनावट कागदपत्रे सादर करुन रेराची परवानगी घेण्यात आल्याची बाब उघड झाली आहे.
Kalyan Dombivali Municipal Corporation
Kalyan Dombivali Municipal Corporationsakal
Summary

कल्याण-डोंबिवली बेकायदा बांधकामांचे पेव फुटले असून याप्रकरणी बनावट कागदपत्रे सादर करुन रेराची परवानगी घेण्यात आल्याची बाब उघड झाली आहे.

डोंबिवली - कल्याण-डोंबिवली बेकायदा बांधकामांचे पेव फुटले असून याप्रकरणी बनावट कागदपत्रे सादर करुन रेराची परवानगी घेण्यात आल्याची बाब उघड झाली आहे. महापालिकेच्या नगररचना विभागाकडून याप्रकरणी मानपाडा व डोंबिवली पोलीस ठाण्यात एकूण 65 विकासकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास आता एसआयटी पथकाकडून केला जाणार आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका तसेच 27 गावांत बेकायदा बांधकामे मोठ्या प्रमाणात उभी राहीली आहेत. बनावट कागदपत्रांसह काही बांधकाम धारकांनी तर बेकायदा रेराचे क्रमांकही मिळविलेले आहेत. वास्तूविशारद संदिप पाटील यांनी माहिती अधिकारात खोट्या कागदपत्रांच्या आधारे महापालिकेकडून बांधकाम परवानगी मिळाल्याचे भासवून रेराकडून बांधकाम प्रकल्पाचा नोंदणी क्रमांक विकासकांनी मिळविल्याची बाब उघडकीस आणली होती.

याप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाने महापालिकेस फटकारले. त्यानंतर महापालिकेला जाग येऊन महापालिकेने चौकशी सुरु केली. रेराने 65 विकासकांना दिलेली नोंदणी प्रमाणपत्र रद्द केल्याने ही बाब उघडकीस आली. त्यानंतर पालिकेच्या नगररचना विभागाकडून 27 विकासकांवर मानपाडा पोलिस ठाण्यात तर 38 विकासकांवर डोंबिवली पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन आठवडा उलटला तरी त्यात समाधान कारक स्थिती नसल्याने हा गुन्हा चौकशीसाठी ठाणे गुन्हे शाखेने हाती घेतला आहे. तर रामनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची चौकशी सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे. या तपासाची व्याप्ती मोठी असल्याने त्यांना सहाय्य करण्यासाठी दोन तीन सहाय्यक अधिकारी त्यांना मदतीला देण्यात येणार आहेत.

या तपासात प्रथम या बांधकामांची कागदोपत्री माहिती संकलित केली जाईल. संबंधित प्रत्येक संस्थेची माहिती तसेच महापालिकेने काय कार्यवाही केली अशा सर्व बाबींचा तपास केला जाणार आहे.

घर घेऊन फसवणूक झालेल्या ग्राहकांना यामुळे न्याय मिळेल. गुन्हे शाखा व विशेष पथकाकडे हा तपास गेल्याने यावर लवकर तोडगा निघेल. शासनाने हा घेतलेला निर्णय चांगला असून हे प्रकरण लवकर मार्गी लागेल.

- संदीप पाटील (वास्तुविशारद)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com