स्वच्छ भारत अभियानामध्ये प्रत्येक नागरिकाने सहभागी व्हावे - आ. गणपत गायकवाड

रविंद्र खरात 
शनिवार, 21 एप्रिल 2018

कल्याण : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत होणाऱ्या स्वच्छता मोहिमेमध्ये प्रत्येक नागरीकाने सहभागी व्हावे त्यासोबत एक दिवस नव्हे प्रति दिन स्वच्छता अभियान राबवा असे आवाहन कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी केले आहे. 

कल्याण : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत होणाऱ्या स्वच्छता मोहिमेमध्ये प्रत्येक नागरीकाने सहभागी व्हावे त्यासोबत एक दिवस नव्हे प्रति दिन स्वच्छता अभियान राबवा असे आवाहन कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी केले आहे. 

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत कल्याण पूर्वमधील पालिकेच्या ड प्रभागक्षेत्र कार्यालय अंतर्गत येणाऱ्या सूचक नाका ते विठ्ठलवाडी रेल्वे स्थानक या परिसरात आज शनिवारी (ता. 21) सकाळी 7 ते 11 या कालावधीत स्वच्छता अभियान राबविण्यात आले . यात आमदार गणपत गायकवाड यांच्या समवेत पालिका ड प्रभाग क्षेत्र अधिकारी वसंत भोंगाडे, कल्याण पूर्व घनकचरा विभागप्रमुख एल. के. पाटील यांच्यासह पालिका ड प्रभाग समिती सभापती सारिका जाधव, नगरसेविका हेमलता पावशे, अरुण दिघे समवेत ड प्रभाग क्षेत्र कार्यालय अधिकारी कर्मचारी आणि भाजपा कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. यावेळी आमदार गणपत गायकवाड यांनी केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान बाबत माहिती देत या अभियान मध्ये सहभागी होण्याचे आवाहन नागरिकांना केले.

तर केंद्र शासनाच्या आदेशानुसार  स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आज ड प्रभाग क्षेत्र कार्यालय अंतर्गत येणाऱ्या भागात स्वच्छता अभियान राबविल्याचे सांगत आगामी वर्षभरात ही मोहीम टप्याटप्याने राबविणार असल्याची माहिती ड प्रभाग क्षेत्र अधिकारी वसंत भोंगाडे यांनी दिली.

Web Title: involve in swach bharat abhiyan