सहार विमानतळावर 31 लाखांचे आयफोन जप्त

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 मार्च 2017

मुंबई - हवाई गुप्तचर विभागाने शुक्रवारी पहाटे सहार विमानतळावर 31 लाखांचे 121 आयफोन जप्त केले. आसिफ इकबाल मुनाफ मालेक असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, तो गुजरातमधील आहे. त्याचे दक्षिण आफ्रिकेत मोबाईलचे दुकान असून,
यामुळे जोहान्सबर्ग ते भरूच हा आयफोन तस्करीचा मार्ग उघड झाला आहे.

आयफोन 4, 4 एस, 5 आणि 6 या श्रेणीतील आयफोन हे स्टेटस सिम्बॉल आहे. दक्षिण आफ्रिकेत चोरलेल्या, हरवलेल्या आयफोनचा डेटा "डी क्‍लाउड' करून ते पुन्हा विक्रीकरता मुंबईत आणले जातात. उपायुक्त प्रज्ञाशील जुमले यांच्या पथकाने हा सापळा रचला. पहाटे जोहान्सबर्ग येथून आलेला आसिफ सहार विमानतळावर उतरला. पहाटे प्रवाशांची अधिक गर्दी असते. प्रवाशाच्या बॅगेवरून त्याला शोधणे फार कठीण होऊन बसते, त्यामुळे गुप्तचर विभागाचे अधिकारी बॅगेज सेक्‍शनवर अधिक लक्ष ठेवून असतात. या अधिकाऱ्यांना गुंगारा देण्याकरता आसिफने व्हीलचेअरचा वापर केला. व्हीलचेअरवर बसलेल्या प्रवाशांना लवकर सोडले जाते, असा आसिफचा समज होता. तो ग्रीन चॅनेलमधून जात असताना त्याच्या बॅगेची झडती घेण्यात आली तेव्हा 121 आयफोन सापडले. दरम्यान, विमानतळावर केलेल्या दुसऱ्या कारवाईत रामलाल मोहनलाल रानसारमानी या प्रवाशाकडून 16 लाखांचे सोने जप्त करण्यात आले.

Web Title: iphone seized on sahara airport