आयपीएस अधिकारी देवेन भारती मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Deven Bharti

आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची बुधवारी मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांमध्ये विशेष आयुक्त (स्पेशल सीपी) हे पद निर्माण करण्यात आले आहे.

Mumbai News : आयपीएस अधिकारी देवेन भारती मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त

मुंबई - आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची बुधवारी मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांमध्ये विशेष आयुक्त (स्पेशल सीपी) हे पद निर्माण करण्यात आले आहे. आयपीएस देवेन भारती यांना या पदावर पहिली नियुक्ती मिळाली आहे. अशाप्रकारे देवेन भारती यांना मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त बनण्याचा मान मिळाला आहे. मुंबई पोलिसांच्या इतिहासात प्रथमच हे पद निर्माण करण्यात आले आहे. या संदर्भात गृह विभागाने आदेश जारी केले आहेत. मात्र, मुंबई पोलिसांच्या विशेष आयुक्तांना किती अधिकार असतील, हे आदेशात स्पष्ट करण्यात आलेले नाही. या संदर्भात आदेश लवकरच निघेल अशी माहिती मिळत आहे.

कोण आहेत देवेन भारती?

देवेन भारती 1994 सालच्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. भारती यांनी महाराष्ट्र राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) नेतृत्व केले होते. त्यापूर्वी ते अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) या पदावरहोते. 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यासह शहरातील अनेक मोठ्या गुन्ह्यांच्या तपासातही त्याचा सहभाग होता. महाविकास आघाडीच्या काळात भारतींची वाहतूक विभागात बदली. आता सत्तांतरानंतर फडणवीसांकडून विशेष पोलीस आयुक्तपदाची निर्मिती करण्यात आली असून, देवेन भारती यांना मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त बनण्याचा मान मिळाला आहे.

फडणवीसांचे निकटवर्तीय

1994 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले भारती हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. फडणवीस यांच्या 2014 ते 2019 या काळात मुख्यमंत्री असताना भारती या सह पोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) होत्या. यानंतर त्यांना दहशतवादविरोधी पथकाच्या अतिरिक्त महासंचालकपदी बढती देण्यात आली. 2019 मध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर भारतीची ताकद कमी झाली होती. त्यांना राज्य सुरक्षा महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक करण्यात आले.