कायदा सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारी नियंत्रित ठेवणे या मुद्द्यांना प्राधान्य; विवेक फणसळकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IPS officer Vivek Phansalkar new Mumbai Police Commissioner Sanjay Pandey retired Priority to maintaining law and order controlling crime

कायदा सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारी नियंत्रित ठेवणे या मुद्द्यांना प्राधान्य; विवेक फणसळकर

मुंबई : वरिष्ठ आयपीएस अधिकारी विवेक फणसळकर यांनी गुरुवारी मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. गुरूवारी पोलीस सेवेतून निवृत्त झालेले संजय पांडे यांच्यानंतर विवेक फणसाळकर यांनी पदभार स्वीकारला. विवेक फणसाळकर हे 1989 च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी असून मुंबई पोलीस आयुक्त पदावर त्याची नियुक्ती बुधवारी गृह विभागाने जाहीर केली. फणसळकर यांनी दक्षिण मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट येथील पोलीस आयुक्त कार्यालयात दुपारी ४.४५ च्या सुमारास पदभार स्वीकारला. नंतर पत्रकारांशी संवाद साधताना, उच्च पोलीस आयुक्त म्हणाले की "मुंबईतील कायदा व सुव्यवस्था राखणे आणि गुन्हे शोधणे हे त्यांचे सर्वोच्च प्राधान्य असेल.

कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच गुन्हेगारीचे प्रमाण कमी करणे, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि मुलांची सुरक्षा या मुद्द्याना सर्वाधिक प्राधान्य दिले जाईल." तसेच पोलीस आयुक्तनी "कर्मचार्‍यांच्या साथीने मुंबई पोलिसांना जगातील सर्वोत्तम आणि बलवान पोलीस दल बनवण्याचा प्रयत्न करतील" असा विश्वास व्यक्त केला. विवेक फणसळकर यांच्या मुंबई पोलीस आयुक्त पदाच्या नियुक्तीपूर्वी ते पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाचे डीजी आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते. ठाणे पोलिस आयुक्त आणि राज्य एटीएस प्रमुख यासह त्यांनी महाराष्ट्र पोलिसांमध्ये विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.

Web Title: Ips Officer Vivek Phansalkar New Mumbai Police Commissioner Sanjay Pandey Retired Priority To Maintaining Law And Order Controlling Crime

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..