विश्वास नांगरे पाटील यांनी घेतली शरद पवारांची भेट; मुंबईतील कायदा व सुव्यवस्थेबाबत केली चर्चा

तुषार सोनवणे
Monday, 28 September 2020

नुकतीच मुंबईत सह पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती झालेले विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे.

मुंबई - नुकतीच मुंबईत सह पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती झालेले विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे.

गुप्तेश्वर पांडे यांना तिकीट न मिळण्याचे प्रयत्न फडणवीसांनी करावेत, सचिन सावंत यांची मागणी
 

विश्वास नांगरे पाटील यांनी बदली झाल्यानंतर नुकताच आपला पदभार स्विकारला आहे. आज सकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांनी वाय बी चव्हाण सेंटर येथे भेट घेतली. पाटील आणि पवार यांच्यात मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेवर चर्चा झाली.

राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांना कोरोनाची लागण; सौम्य लक्षणे असल्याने होम क्वारंटाईन

मुंबई, पुणे ग्रामीण, कोल्हापूर, नाशिक या ठिकाणी महत्वाच्या पदांवर जबाबदारी सांभाळल्यानंतर नांगरे पाटील यांची मुंबईत बदली झाली आहे. नाशिकमध्ये दीड वर्ष कर्तव्य पार पाडल्यानंतर आता पुन्हा एकदा नांगरे पाटलांनी मुंबई गाठली आहे. नांगरे पाटील यांनी नाशिक सोडत असताना भावूक झाले होते. त्यांनी नाशिकरांसाठी एक ऑडिओ संदेश शेअर केला होता. त्यात त्यांनी नाशिककरांचे भावनिक आभार मानले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ips Vishwas Nangre Patil meets Sharad Pawar Discussion on law and order