

मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आडोशी इथं ३ फेब्रुवारीला प्रोपलिन गॅसचा टँकर उलटल्यानं भीषण वाहतूक कोंडी झाली होती. तब्बल ३२ तासांच्या वाहतूक कोंडीनंतरही टोलनाक्यावर टोल वसुली करण्यात आली. या प्रकारामुळे वाहनचालकांनी संताप व्यक्त केला होता. आता वाहतूक कोंडीत अडकल्यानं ज्यांच्याकडून टोल वसूल केला होता त्यांचे पैसे परत देण्याचे आश्वासन आयआरबीकडून देण्यात आलेय. खालापूर टोल नाक्यावर मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत याबाबत आयआरबी कंपनीनं हे आश्वासन दिलं.