

IRCTC decision on Railway tea and snacks
ESakal
मुंबई : रेल्वे प्रवासात चहा, नाश्ता किंवा पाणी विकत घेताना छापील दरापेक्षा जादा पैसे आकारले जात असल्याच्या अनेक प्रवाशांच्या तक्रारी असतात. त्यावर उपाय म्हणून आयआरसीटीसी रेल्वे डब्यातील सर्व कर्मचाऱ्यांना एकसमान गणवेश, हेल्पलाइन क्रमांक आणि क्यूआर कोड असलेले ओळखपत्र अनिवार्य करणार आहे. हा क्यूआर कोड स्कॅन करून प्रवासी पदार्थांचे निश्चित दर तपासू शकतील आणि थेट ऑनलाइन पेमेंटही करू शकतील.