IRCTC new user-friendly railway ticket booking website interface with faster online booking experience
sakal
मुंबई : रेल्वेचे तिकीट बुकिंग ऑनलाइन अधिक जलद, सोपे आणि वापरकर्ता अनुकूल करण्यासाठी आयआरसीटीसी संकेतस्थळाचा मोठा कायापालट करत आहे. नव्या संकेतस्थळाची आपल्या बीटा आवृत्ती शुक्रवारी जयपूर येथील मालवीय राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या (एमएनआयटी) विद्यार्थ्यांसमोर सादर करण्यात आली. त्यांच्या सूचना आणि अभिप्रायाच्या आधारे अंतिम सुधारणा केल्यानंतर हे संकेतस्थळ लवकरच प्रवाशांसाठी उपलब्ध केले जाणार आहे.