esakal | कोरोनापासून वाचण्यासाठी दुहेरी मास्क फायदेशीर?

बोलून बातमी शोधा

Double-Mask
कोरोनापासून वाचण्यासाठी दुहेरी मास्क फायदेशीर?
sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई: शहरात अनेक ठिकाणी कोरोनाची दुसरी लाट पसरली आहे. या विषाणूमध्ये झालेल्या बदलामुळे हवेतुनही याचे संक्रमण पसरु लागले आहे. त्यामुळे, मुंबईकरांनी आता जास्त काळजी घेतली पाहिजे असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. त्यानुसार, नागरिकांनी दुहेरी मास्कचा वापर करावा आहे आवाहन राज्य टास्क फोर्स समितीकडून करण्यात आले आहे. वाढत्या प्रादुर्भावामुळे सुरक्षेकडे दुर्लक्ष न करता हात धुणे, मास्क वापरणे, सोशल डिस्टंसिंग पाळणे या सवयी कायम पाळणे आवश्यक आहे.

गेले दीड वर्ष संपूर्ण जग कोरोनाशी झगडत आहे. या दरम्यान, अनेक विविध औषधे आली तरी त्याचा कितपत उपयोग होतो याबद्दल अजूनही साशंकता आहे. म्हणून मास्क घालणे हात धुणे आणि अंतर ठेवणे त्याचबरोबर लसीकरण ही चौसूत्री आपल्याकडे आहे. यातील सर्वात महत्वाचे म्हणजे मास्क घालणे. कोरोना हा विषाणू आपल्या नाकातून किंवा तोंडातून घशापर्यंत जातो जिथे म्युकस मेम्ब्रेन्स आहेत आणि तिथून तो आपल्या शरीरामध्ये शिरकाव करतो आणि म्हणून मास्क हा असा घटक आहे जो आपले नाक आणि तोंड दोन्ही झाकतो. ज्याद्वारे आपण हवा आणि अन्न घेतो ते आपण पूर्णपणे झाकले पाहिजेत.

हेही वाचा: तन्मय फडणवीस मुद्द्यावरून अमृता फडणवीस मैदानात; म्हणाल्या...

सर्जिकल मास्कचा वापर गरजेचा- मास्कचे विविध प्रकार असतात. मास्क कपड्याने बनवलेला असतो. मास्कचे सर्जिकल मास्क हा 3 प्लाय एन 95 एन 99 आणि पी 100 असे प्रकार असतात. एन 95 मध्ये 95% विषाणू फिल्टर करू शकतो. एन 99 मध्ये आपण 99% करू शकतो आणि पी 100 मध्ये 100% विषाणू फिल्टर होतात असं म्हणतात. पण असं कधीच नसतं आणि चांगल्या पद्धतीचा जो मास्क असतो म्हणजे एन 95 त्याची क्षमता नक्कीच जास्त असते. डॉक्टर्स, नर्सेस किंवा

कोविड भागात काम करणारे आहेत त्यांनी एन 95 मास्क वापरावे. तर, सर्वसामान्यांनी मल्टिलेयर मास्क वापरावे. असंही लक्षात आलं आहे कि साध्या कपड्याच्या मास्कची गुणवत्ता चांगली नसते, असे राज्य टास्क फोर्सचे सदस्य डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.

हेही वाचा: "लॉकडाउन संपू दे, मग देवेंद्र फडणवीसांना..."

दुहेरी मास्कचा वापर- 3 प्लाय मास्क आणि त्यावर जर कपड्याचा मास्क वापरला तर हवा फिल्टर होऊन आपण विषाणू पासून वाचू शकतो. एन 95 वापरला तर उत्तम पण, दुहेरी मास्क हा जास्त प्रभावी आहे.

सार्वजनिक ठिकाणी मास्क काढू नये- कोविड पासून सुरक्षेसाठी सार्वजनिक ठिकाणी मास्क काढणे धोकादायक ठरू शकते. सार्वजनिक ठिकाणी कमीत कमी वेळा मास्क काढले पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी खाताना सुद्धा कमी वेळा मास्क काढलं जाईल याची दक्षता घ्या. एकटे असाल तेव्हाच मास्क काढा. पण, हात स्वछ असतील याची काळजी घ्या. हॉटेलमधून जेवण घेत असाल तेव्हा घेताना मास्क घाला आणि टेबल वर आल्यावर 5 ते 10 मिनिटे मास्क काढा. पाणी पिताना सुद्धा तुम्ही एकटे आहेत का ? याची खात्री करून मगच मास्क काढा. जास्त गर्दीत मास्क काढू नका. मास्क घालताना नाक आणि हनुवटी झाकली जाईल याची दक्षता घ्या.

साधारणतः एन 95 मास्क हा 5 ते 6 वेळा वापरता येतो. कापडी मास्क असतात ते रोज स्वछ साबणाने धुवून वापरले पाहिजे. सर्जिकल मास्क एकदा वापरून फेकून द्यायला हवेत. फिल्टर मास्कचा वापर करु नये त्यातुन, हवा पसरु शकते. मास्क हा व्यवस्थित 8 ते 10 तास घालता येईल असा असावा असेही डॉ. सुपे यांनी सांगितले.

(संपादन- विराज भागवत)