esakal | उद्धव ठाकरेंच्या नाराजीबद्दल सरकारने कळवलं का? - संजय राऊत
sakal

बोलून बातमी शोधा

उद्धव ठाकरेंच्या नाराजीबद्दल सरकारने कळवलं का? - संजय राऊत

उद्धव ठाकरेंच्या नाराजीबद्दल सरकारने कळवलं का? - संजय राऊत

sakal_logo
By
वैदही काणेकर

मुंबई: वर्षा निवासस्थानी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांची बैठक झाली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केल्याची माध्यमांमध्ये चर्चा आहे. या संदर्भात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना विचारलं. त्यावर राऊत यांनी, "नाराजीबद्दल तुम्हाला सरकारकडून कळवण्यात आले आहे का? अफवांवर विश्वास ठेवू नका ?" असं सांगितलं. (Is govt inform you about uddhav thackeray is upset sanjay raut )

"अफवा पसरवणे हा गुन्हा आहे. शरद पवार हे काही दिवस आजारी होते त्यानंतर काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांना भेटले. महाराष्ट्रात अनेक विषय आहेत. मराठा आरक्षण ,पदोन्नती आरक्षण, कोरोना असे अनेक विषय आहेत" असे राऊत म्हणाले.

हेही वाचा: मराठा समाजाचं दु:ख शरद पवारांना सांगितलं - संभाजी राजे

हे सरकार पाच वर्षे पूर्ण करणार असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. शरद पवार यांचा या सरकारला पूर्ण आशीर्वाद आहे, असे राऊत म्हणाले.