esakal | १५ मे नंतर लॉकडाउन वाढेल का? तात्याराव लहाने म्हणतात....

बोलून बातमी शोधा

Tatyarao Lahane
१५ मे नंतर लॉकडाउन वाढेल का? तात्याराव लहाने म्हणतात....
sakal_logo
By
दीनानाथ परब

"केंद्राच्या टास्क फोर्सने देशपातळीवर लॉकडाउन करण्याचा सल्ला दिला आहे. देशात दररोज चार लाखापर्यंत कोरोना रुग्ण वाढ होत आहे. सक्रिय रुग्णांची संख्या वाढतेय. त्या प्रमाणात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स, बेड्स उपलब्ध होणं कठीण जातय, म्हणून केंद्राच्या टास्क फोर्सने देशव्यापी लॉकडाउनचा (Lockdown)सल्ला दिलाय" असे राज्याच्या कोविड टास्क फोर्सचे सदस्य तात्याराव लहाने (tatyarao lahane)यांनी सांगितले.(Is Lockdown extend after 15 th may tatyarao lahane said)

"महाराष्ट्राने १५ ते १६ दिवसांपूर्वीच लॉकडाउन केला. हे पाऊल राज्याने आधीच उचललं आहे. बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आता लाट स्थिर होताना दिसत आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली, तरी आपण ती संख्या स्थिर होतेय, असे म्हणूया" असे तात्याराव लहानेंनी सांगितले.

हेही वाचा: CT Scan बद्दल तात्याराव लहानेंनी दिली महत्त्वाची माहिती

"लॉकडाउनचा परिणाम होताना दिसतोय. पुन्हा लॉकडाउनची गरज पडणार नाही. १५ मे ला स्थितीचा आढावा घेऊन, पुढचा निर्णय घेतला जाईल. महाराष्ट्राने चांगला निर्णय घेतला, त्यामुळे आज व्हेटिलेटर, बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिव्हीर उपलब्ध आहेत. लॉकडाउनचा फायदा झालेला आहे" असे लहाने म्हणाले.

हेही वाचा: मुंबईचे वाईट दिवस संपल्यात जमा

१५ मे नंतर राज्याचा लॉकडाउन वाढेल का? या प्रश्नावर लहाने म्हणाले की, "सांख्यिकी दृष्टीकोनातून पाहिलं तर सुरुवातीला संसर्गाचे प्रमाण ४० टक्के होते. त्यानंतर ते कमी होऊन २३ टक्के आणि आता २० टक्के आहे. तिसऱ्या सप्ताहात रुग्णसंख्या कमी होत आहे." "आता कडक लॉकडाउनची गरज उरणार नाही. संख्या अशीच कमी होत राहिली, तर निर्बंध हळूहळू शिथील केले जातील. निर्बंध शिथील केले की, लगेच आपण दुरुपयोग करतो. शिथीलतेचा गैरफायदा घेतो" असे लहाने म्हणाले.