esakal | CT Scan कधी करायचं? तात्याराव लहानेंनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती

बोलून बातमी शोधा

तात्याराव लहाने
CT Scan कधी करावं? तात्याराव लहाने म्हणतात...
sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: कोरोनाच्या (corona patient)वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्या मोठ्या प्रमाणावर सीटी स्कॅन (ct scan test)केले जात आहे. सीटी स्कॅन सेंटरमध्ये गर्दी होत आहे. कोरोनाचा संसर्ग तपासण्यासाठी केल्या जाणाऱ्या या सीटी स्कॅन चाचण्या धोकादायक ठरु शकतात, असे एम्सचे प्रमुख रणदीप गुलेरीया यांनी म्हटले आहे. सीटी स्कॅनमुळे कॅन्सर होण्याचाही धोका संभवतो. त्यामुळे सीटी स्कॅनचे नेमके काय निकष आहेत, या बदद्ल राज्याच्या टास्क फोर्सचे सदस्य (State task force) तात्याराव लहाने (tatyarao lahane) यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना महत्त्वाची माहिती दिली. (State task force member tatyarao lahane gave important information regarding ct scan test by corona patient)

"सीटी स्कॅन करताना रेडिएशन असते. या बद्दल सर्वांना माहित आहे. जास्तवेळ सीटी स्कॅन केल्यास हे रेडिएशन शरीराला अपायकारक ठरु शकते. आता पेशंट आला की, लगेच आपण सीटी स्कॅन करतो. सीटी स्कॅनच्या टास्क फोर्सने काही गाईडलाईन दिल्या आहेत" असे तात्याराव लहाने म्हणाले.

हेही वाचा: मुंबईचे वाईट दिवस संपल्यात जमा

"तुमच्यामध्ये कोरोनाची चिन्ह-लक्षण असतील, तुम्हाला दोन-तीन दिवस ताप येत असेल, तर सीटी स्कॅन करा. चिन्ह-लक्षण नसताना सीटी-स्कॅन करण्याची गरज नाही. सीटी स्कॅन केल्यानंतर लगेच कॅन्सर होईल, म्हणून घाबरुन जाऊ नका. तंत्रज्ञ अनेक वर्ष सीटी स्कॅन मशीन ऑपरेट करत असतात" त्यांचे उदहारण तात्याराव लहाने यांनी दिले.

हेही वाचा: काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या प्रकृतीबद्दल चांगली अपडेट

"शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण ९५ पेक्षा कमी असेल, कोरोनाची लक्षणे असतील, तर फुफुसांमध्ये कितपत संसर्ग झालाय, ते तपासण्यासाठी सीटी स्कॅन करणं योग्य आहे. पण कोरोनाच्या ८० टक्के रुग्णांमध्ये लक्षणेच नसतात, त्यांनी सीटी स्कॅन करण्याची आवश्यकता नाही" असे लहाने म्हणाले. "काही जण सीटी स्कॅनवरुन उपचार सुरु करतात. पण असे करु नका, कोरोना चाचणी करा, त्या रिपोर्टच्या आधारावर उपचार करा" असा सल्ला तात्याराव लहाने यांनी दिला.