मुंबईनजीकच्या बेटांवर आता थेट गाडीने जाता येणार; महापालिकेने घेतला पुढाकार

समीर सुर्वे
Monday, 17 August 2020

या सहा पूलांसाठी महानगर पालिकेने सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरु केली असून त्यासाठी सुमारे 1 कोटी 50 लाख रुपयांचे शुल्क महापालिका देणार आहे. 

मुंबई : पश्चिम उपनगरांतील मढ आणि मनोरी ही दोन्ही बेटांना मुंबईला जाण्यासाठी आतापर्यंत फेरीबोटीचा आधार होता. मात्र, पावसाळ्यात अनेक वेळा फेरीबोट सेवा बंद असल्यास आपात्कालीन परीस्थितीत ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. तसेच या गावातील अनेक नागरिकांचा प्रमुख व्यवसाय मासेमारी असला तरी रोजीरोटी आणि शिक्षणासाठी मुंबईत येणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.

सोशल मीडियावर एखाद्याला ब्लॉक करण्यासाठी केंद्राने आदेश द्यावेत; फेसबुकची उच्च न्यायालयाला माहिती

तसेच सिनेमा आणि मालिकांचे चित्रीकरणही या भागात होते. इथला समुद्र किनारा, किल्ला नेहमीच मुंबईतील पर्यटकांचे आकर्षण आहे. रात्री फेरीबोट सेवा बंद झाल्यानंतर या बेटाचा मुंबईशी संपर्कच तुटतो. तशीच परिस्थिती मनोरी, गोराई गावांची आहे. या गावात रस्तावरुन जायचे झाल्यास मिरा-भाईंदरमधून यावे लागते. तर मनोरीला जाण्यासाठी मार्वे येथून फेरी बोट सेवा आहे, तर गोराई बेटावर जायचे झाल्यास बोरीवली येथील गोराईतून फेरीबोट सेवा आहे. येथील किनारे मुंबईच्या गजबटापासून दूर असल्याने एक दिवसाच्या सहलीसाठी प्रसिध्द आहेत.

राज्य सरकारच्या आदेशाला ST प्रशासनाकडून केराची टोपली; गर्भवती आणि व्याधीग्रस्तांना कामतून सुट नाहीच

त्याचबरोबर बेटावरुन रोजच्या रोज शिक्षण आणि नोकरीसाठी मुंबईत येणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे महापालिकेने वर्सोवा खाडीतून मढपर्यंत आणि मनोरी खाडीतून मार्वे ते मनोरी पर्यंत पुल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सल्लागार नियुक्त करण्यात येणार आहे.  या दोन पुलांबरोबरच पश्‍चिम उपनगरात मालाड येथे एव्हरशाईन नगर नाल्यावर वाहतूक पूल, मार्वे रोडवर धारवील गाव येथे पूल, इन्फिनिटी मॉलजवळ पूल आणि ओशिवरा नदी ते मालाड खाडीवर पूल बांधण्यात येणार आहे. त्यामुळे पहिल्यांदाच ही दोन बेट मुंबईच्या मुख्य भूमीशी थेट जोडली जाणार आहेत. 

गणरायाच्या आगमनापूर्वी मुंबईकरांना मिळणार आनंदाची बातमी; दूर होणार मोठे संकट

या सहा पूलांसाठी महानगर पालिकेने सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरु केली असून त्यासाठी सुमारे 1 कोटी 50 लाख रुपयांचे शुल्क महापालिका देणार आहे. 
----------
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: island near western suburbans will connected by road soon, bmc appoints adviser