रेल्वेचे कोविड रुग्णांच्या विलगीकरणासाठी तयार केलेले 892 कोच पडलेत धूळखात

रेल्वेचे कोविड रुग्णांच्या विलगीकरणासाठी तयार केलेले 892 कोच पडलेत धूळखात
Updated on

मुंबई : राज्यात पहिल्या कोरोना लाटेमुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड दबाव होता. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता रेल्वे मंत्रालयाने पुढाकार घेऊन, विलगीकरणासाठी रेल्वे कोचेस उपलब्ध करुन दिले. यासाठी डब्यांना विलगीकरण कोचमध्ये रुपांतर करण्यात आले होते. मात्र दरम्यानच्या काळात  राज्य सरकारने जंबो कोविड केंद्र उभारणी आणि  रुग्णालय व्यवस्था  सशक्त केल्याने कोरोना संसर्ग रोखण्यात सरकारला यश मिळाले. त्यामूळे कोट्यवधी रूपये खर्च करून तयार केलेले रेल्वेचे 892 विलगीकरण डब्ब्यांचा प्रत्यक्षात काहीच फायदा झाला नाही. आता हे डबे विवीध विभागात धुळखात पडले आहे. 

कोरोना संसर्गाच्या सुरुवातीच्या काळात विलगीकरणाचे प्रश्न होते. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता   रेल्वे मंत्रालयाने एप्रिल, मे महिन्यात विलगीकरणासाठी रेल्वेचे कोचेस उपलब्ध करुन दिले. यासाठी मध्य रेल्वेच्या लोअर परळ आणि पश्चिम रेल्वेच्या माटुंगा वर्कशॉपमध्ये रेल्वे डब्ब्यांना विलगीकरण डब्यामध्ये रुपांतरीत करण्यात आले.

मात्र, कोरोनाची लाट लक्षात घेता राज्य सरकारने आरोग्य व्यवस्था मजबूत केल्यामुळे, कोरोनाची लाट रोखण्यात सरकारला यश आले. त्यामूळे या रेल्वे डब्ब्यांची गरज पडली नसल्याने, कोटींचा खर्च करून या डब्यांचा कितपत वापर होईल यावर प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

एकुण 892 विलगीकरण डब्बे  

मुंबई विभागात 104 त्याचप्रमाणे भुसावळ 79, नागपूर 60, पुणे 60, सोलापूर 179 असे एकुण 482 आयसोलेशन कोच तयार केले गेले. तर पश्चिम रेल्वे मार्गावर 410 असे एकूण 892 डब्यांचे रुपांतरण विलगीकरण कक्षात केले. प्रवाशांमध्ये अंतर ठेवता यावे याचे नियोजन करण्यात आले होते.  शिवाय, स्वच्छतागृहांसह, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय सुद्धा करण्यात आली होती. 

एक आयसोलेशन कोच तयार करण्यासाठी 72 हजार रूपयांचा खर्च केला गेला. या हिशोबाने दोन्ही मार्गावर विलगीकरण  कक्षात रुपांतरीत करण्यासाठी सुमारे 6 कोटी 42 लाख 24 हजार रूपयांचा खर्च झाला. आता पुन्हा हे विलगीकरण डब्यांचे प्रवासी डब्यांमध्ये रुपांतर करतांना कोटीच्या घरात खर्च केला जाणार आहे.

विलगीकरण डब्यातील सुविधा

मच्छरदाणी, ओला आणि सुका कचरा गोळा करण्यासाठी कचरा पेट्या, ऑक्सीजन सिलेंडर, कर्टंनची सुविधा 

राज्य शासनाच्या मदतीसाठी प्रवासी डब्यांचे रुपांतरण विलगीकरण डब्यात करण्याच्या सुचना रेल्वे मंत्रालयाने दिल्या होत्या. त्यानुसार मध्य रेल्वेच्या पाचही विभागात डब्यांचे रुपांतरण करण्यात आले आहे. अद्यापही डबे सज्ज आहे. मात्र, अद्याप राज्य सरकारची डब्यांसाठी मागणीच आली नाही. त्यामूळे डब्बे  संबंधीत विभागात उभे करून सज्ज ठेवण्यात आले आहे, असं मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील म्हणालेत.

राज्य सरकारने कोरोनाच्या रुग्णांसाठी जंबो कोविड सेंटर उभारले होते. त्यामूळे मोठ्या प्रमाणात रुगांसाठी खाटा उपलब्ध होत्या मात्र, कोरोनाची लाट आल्यास, बॅकअप प्लॅन म्हणून रेल्वेने डब्यांचे रुपांतरण केले होते. अद्यापही हे डबे रेल्वेच्या विविध यार्डमध्ये आहेत. कोरोनाची संपुर्ण लाट ओसरल्यानंतर या डब्बांचे काय करायचे यावर निर्णय घेतला जाणार आहे असं पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर म्हणालेत.

isolation coaches made by central and western railways are unused and ignored

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com