भोंग्यापेक्षा महागाईचा मुद्दा महत्त्वाचा - सुप्रिया सुळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

issue of inflation is more important than loudspeaker  Supriya Sule navneet rana ravi rana

भोंग्यापेक्षा महागाईचा मुद्दा महत्त्वाचा - सुप्रिया सुळे

ठाणे : सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कामकाजात व्यस्त असल्यामुळे भोंगे, हनुमान चालिसा अशा मुद्द्यांसाठी मला वेळ नाही. सध्याच्या घडीला माझ्यासाठी महागाईचा मुद्दा जास्त महत्त्वाचा असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. तसेच खासदार असल्याने मतदारसंघात मला खूप कामे आहेत, त्यामुळे ती कामे माझ्या दृष्टीने महत्त्वाची आहे. त्यामुळे मला इतर गोष्टींकडे बघण्यासाठी वेळ नसल्याचे सांगत राणा दाम्पत्याचे नाव न घेता टोला लगावला.

ठाणे शहरात टिप टॉप प्लाझा येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी त्या बोलत होत्या. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यावर अन्याय झाला आहे. त्यांच्यावर काही आरोप करण्यात आलेले आहेत, त्यात तथ्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गणेश नाईक यांच्यावर झालेल्या आरोपाबाबत मात्र कोणाच्याही वैयक्तिक आयुष्यावर आरोप-प्रत्यारोप करणे अयोग्य असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचा मुलांवर देखील परिणाम होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विरोध वैचारिक असावा

पालघर (बातमीदार) : देशातील सर्व राज्ये महागाई कमी करण्यासाठी व्यस्त आहेत. केंद्र सरकारकडून जीएसटीचे पैसे वेळेवर मिळत नाहीत. आज प्रत्येक पक्ष सध्या महागाईच्या विरोधात लढत आहे. मात्र कोणत्याही प्रकारचा मार्ग केंद्र सरकार काढू शकलेले नाही, अशी टीका मनोरमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

Web Title: Issue Of Inflation Is More Important Than Loudspeaker Supriya Sule Navneet Rana Ravi Rana

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top