पाऊस सुरु झालाय अन् मुंबईतील फक्त 3 टक्के मॅनहोल्स सुरक्षित

manholes in Mumbai
manholes in Mumbai
Updated on

मुंबई : निष्णांत पोटविकार तज्ज्ञ डॉ. दीपक अमरापुरकर यांच्या अपघाती मृत्युनंतर महानगर पालिकेने मुंबईतील मॅनहोल्स लोखंडी जाळ्या लावून सुरक्षित करण्याचा निर्णय घेतला. मात्र, गेल्या तीन वर्षांत केवळ 3 टक्के मॅनहोल्स सुरक्षीत झाले आहेत. मुंबईत एकूण 95 हजार मॅनहोल्स असून त्यातील अवघ्या 2,772 मॅनहोल्सनाच लोखंडी जाळ्या लावण्यात आल्या आहेत.

2017 मध्ये एल्फिस्टन रोड येथील उघड्या मॅनहोल्समध्ये जागतिक किर्तीचे पोटविकार तज्ज्ञ डॉ. अमरापुरकर यांचा मृत्यू झाला होता. डॉ. अमरापुरकर यांच्या मृत्युनंतर महानगर पालिकेने मॅनहोल्सना लोखंडी जाळ्या लावण्याचा निर्णय घेतला. या प्रत्येक लोखंडी जाळीसाठी साधारण 10 हजार रुपयांपर्यंत खर्च येत आहे. मात्र महापालिकेने आतापर्यंत केवळ 2,772 मॅनहोल्संनाच लोखंडी जाळ्या बसवल्या आहेत.

पाणी साचणाऱ्या भागात सर्वाधिक जाळ्या 
प्रामुख्याने पंपिंग स्टेशनकडे जाणाऱ्या प्रमुख मलवाहिन्यांवरील मॅनहोल्स तसेच ज्या भागात पाणी साचते, त्या भागातील मॅनहोल्सवर जाळ्या बसवण्यात आल्या आहेत. शहर विभागात सर्वाधिक म्हणजे 2008, पश्‍चिम उपनगरात 293 आणि पूर्व उपनगरांत 399 मॅनहोल्सवर या जाळ्या बसवण्यात आल्या आहेत.

It has started raining and only 3% of manholes in Mumbai are safe

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com