...तर आपण कोरोना हरवू शकत नाही, डब्ल्यूएचओ महासंचालकांचा गंभीर इशारा

WHO
WHO

दुबई : जागतिक स्तरावर एकजूट नसल्यास आपण कोरोनाला हरवू शकत नाही, असे स्पष्ट मत जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस यांनी व्यक्त केले आहे. संयुक्त अरब अमिरातीमधील दुबई येथे व्हर्च्युअल हेल्थ फोरम परिषदेत ते बोलत होते. 

गेले तीन-चार महिने जगाला कोरोना महामारीने हैराण केले आहे. शास्त्रज्ञ या विषाणूवर लस शोधण्याचे प्रयत्न वेगवेगळ्या पातळ्यांवर करत आहेत. रुग्णांच्या संख्येत दररोज वेगाने वाढ होत आहे. सुरुवातीला कोव्हिडच्या रुग्णांची संख्या 10 लाख होण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागला; मात्र आता आठ दिवसांत 10 लाख रुग्णांची भर पडत आहे, असे डॉ. घेब्रेयेसस म्हणाले. 

सध्याच्या काळात सगळ्यात मोठा धोका कोरोना विषाणूपासून नाही; तर जागतिक एकजूट कमी असल्यामुळे आहे. एकजुटीचा अभाव असल्यास आपण कोरोनाच्या महामारीचा सामना करू शकत नाही, असा इशाराही त्यांनी दिला. कोव्हिड-19 विषाणूच्या संसर्गामुळे जगभरात चार लाख 65 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. या काळात कोणीही राजकारण करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला. 

दुसऱ्या लाटेची भीती
विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. संपूर्ण जगावर एक मोठे संकट आले आहे, असे सांगत कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीतीही डॉ. टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस यांनी बोलून दाखवली. कोरोनाच्या संकटातून सावरण्यासाठी आता अनेक देश प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या या वक्तव्यामुळे जगाची चिंता वाढली आहे.

It is impossible to defeat Corona without global unity, a serious warning from the WHO

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com