esakal | समाजाची मानसिकता बदलणे आवश्यक : डॉ. नीलम गोऱ्हे
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

समाजाची मानसिकता बदलणे आवश्यक : डॉ. नीलम गोऱ्हे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोना (Corona) काळात समाजमाध्यमांचा वाढलेला वापर, त्यातून अल्पवयीन मुला-मुलींमध्ये निर्माण झालेली जवळीक आणि नको त्या गोष्टींबाबत तयार झालेल्या आकर्षणातून अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या (Rape) घटना वाढल्या आहेत. डोंबिवलीतील (Dombivali) घटनेतही नेमके हेच झाल्याचे दिसते. त्यामुळे पालक किंवा समाज म्हणून पाल्यांविषयी आपली जबाबदारी निश्चित वाढली आहे. महिला अत्याचाराबाबत समाजात सन्मानाची भूमिका निर्माण होण्यासाठी कायदे हे केवळ साधन आहेत. त्यापेक्षा पुरुषांची मानसिकता बदलली पाहिजे, असे मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) यांनी व्यक्त केले.

‘कॉफी विथ सकाळ’ या कार्यक्रमात गोऱ्हे यांनी जगभरातील महिलांच्या प्रश्नांसोबतच विविध मुद्द्यांवर मनमोकळा संवाद साधला. निर्भयासारख्या घटनांनंतर महिला अत्याचारासंर्दभात अनेक कायदे आले, परंतु त्यानंतरही वारंवार घटना घडतात. या विषयांबाबत समाजातही अनेक वेळा चर्चा होते. जगभरात त्याचे पडसाद उमटतात. प्रसारमाध्यमे आणि न्यायदेवतेकडून दखल घेतल्याने महिलांच्या प्रश्नांवर प्रकाश पडला गेला. संयुक्त राष्ट्राच्या अधिवेशनामध्येही महिला सक्षमीकरणापासून ते हिंसाचार, राजकारणावर बरीच चर्चा होत असते. याशिवाय जगभरातील विविध संसदेमध्ये महिलांच्या प्रश्नाबाबत ऊहापोह केला जातो. एवढे असतानाही महिलांबाबत समाजाची मानसिकता अद्यापही चांगली आहे, असे म्हणता येत नाही. त्यामुळे त्यात बदल करण्याची गरज असल्याचे गोऱ्हे म्हणाल्या.

हेही वाचा: राज्यसभेतही १२७ व्या घटनादुरुस्तीचं विधेयक पूर्णबहुमतानं पारित!

शक्ती विधेयक सध्या विधिमंडळाच्या संयुक्त चिकित्सा समितीकडे आहे. मध्यंतरी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी समितीचे अध्यक्षपद सोडल्याने त्याबाबतचे कामकाज रखडले. आता नवे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी समितीचा पदभार घेतला असून मसुद्यातील काही मुद्द्यांवर चर्चा होईल आणि त्यानंतर विधेयक सभागृहात येईल.

- डॉ. नीलम गोऱ्हे, उपसभापती, विधान परिषद.

loading image
go to top