शरीरासोबत मनाची मशागत आवश्यक, आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे आवाहन

भाग्यश्री भुवड
Monday, 7 September 2020

शरिरासोबतच मनाचीही मशागत आवश्यक आहे. यातून आपण कोणत्याही संकटावर मात करू शकतो, असे प्रतिपादन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले.

मुंबई : सकारात्मकता आणि इच्छाशक्तीच्या बळावर आपल्याला कोरोनासारख्या महामारीवर विजय मिळवायचा आहे.  कोरोनाने आपल्याला सुदृढ राहायला शिकवले. मात्र, शरिरासोबतच मनाचीही मशागत आवश्यक आहे. यातून आपण कोणत्याही संकटावर मात करू शकतो, असे प्रतिपादन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले. 'कोरोनाशी दोन हात' या कार्यक्रमात ते बोलत होते.

अपयश झाकण्यासाठी भावनिक विषयांवर फोकस; प्रवीण दरेकर यांचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात

आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, प्रत्येकाने आपली प्रतिकारशक्ती चांगली ठेवावी. योग्य आहार, पुरेशी झोप आणि व्यायाम या सगळ्या गोष्टी कराव्यात. हंगामी सांसर्गिक आजार जसे डेंग्यू व मलेरिया यांवर मात करण्यासाठी प्रतिकारशक्ती चांगली हवी. यासाठी योग, प्राणायाम यांचेही खूप महत्त्व आहे. कोरोना काळात वाफ घेणे, गरम पाणी पिणे, काढा घेणे यासुद्धा महत्वाच्या बाबी असल्याचे त्यांनी सांगितले.

रिया चक्रवर्तीची एनसीबीकडून चौकशी; अडचणी वाढण्याची शक्यता

आता आपल्याला आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी शिस्तबद्ध जीवनशैलीची सवय लावून घ्यावी लागेल. जिभेवर आणि मनावर ताबा ठेवूनच सदृढ आयुष्य जगता येईल. तसेच, या काळात जंक फुड खाण्यावर नियंत्रण ठेवावे, असे आवाहनही त्यांनी केले. 
याकाळात लोकांना समुपदेश करणे हा महत्वाचा विषय आहे. लाॅकडाऊनमध्ये अनेकांची नोकरी गेली. व्यवसाय ठप्प पडले. मात्र, याने खचून न जाता वाटचाल करत राहावी. यासाठी मनाची मशागत करावी, असे आवाहन त्यांनी केले.

-----------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: It is necessary to cultivate the mind along with the body! Health Minister Topes appeal