महानगरपालिका परिवहन उपक्रमातील राजकारणावर आळा घालणे आवश्यक

रविंद्र खरात 
बुधवार, 9 जानेवारी 2019

कल्याण - गेल्या 30 ते 32 वर्ष भारतीय जनता पक्षात सर्व सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत असताना पक्षाने माझ्यावर विश्वस ठेवून परिवहन समिती सदस्य ते सभापती पद दिले. परिवहन उपक्रमातील उपन्न वाढीसाठी माझ्या सहित सर्व परिवहन समिती सदस्य, पालिका पदाधिकारी, केडीएमटीमधील व्यवस्थापक मारुती खोडके हे प्रयत्न करत आहेत. मात्र कर्मचारी संघटनेमधील राजकारण, कर्मचारी वर्गात बेशिस्तपणा आणि केडीएमटी अधिकाऱ्यांमधील अंतर्गत वाद हे सर्व वेळीच थांबले नाही तर एक दिवस केडीएमटी बंद होईल अशी भिती सभापती सुभाष म्हस्के यांनी व्यक्त केली आहे.

कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन समितीमध्ये एकूण 13 सदस्य असून सभापती सुभाष म्हस्के यांच्या समवेत राष्ट्रवादी मधून भाजपा पक्षात प्रवेश करणारे नितीन पाटील, संतोष चव्हाण(शिवसेना), राजेंद्र दीक्षित(शिवसेना), प्रल्हाद म्हात्रे(मनसे), शैलेंद्र भोईर(काँग्रेस) आदीचा 28 फेब्रुवारी रोजी 4 वर्षाचा कालावधी संपुष्टात येत आहे. नव्याने 6 सदस्य निवडणूक प्रकिया पालिका सचिव कार्यालय मार्फत करण्यात येणार आहे. याबाबत सभापती सुभाष म्हस्के यांची संपर्क साधला असता पक्षाने दिलेली जबाबदारी आणि 4 वर्षाच्या अनुभवावर बोलताना म्हस्के म्हणाले, सर्व सदस्य आणि व्यवस्थापक, प्रति दिन उपन्न वाढीसाठी रस्त्यावर उतरून काम करत आहेत. मात्र केडीएमटी मधील काही अधिकारी आणि काही कर्मचारी संघटना पदाधिकारी यांच्या मधील राजकारण, बेशिस्तपणा मुळे दिवसेंदिवस उपन्न घटत आहे. 

दांडी बहाद्दर कर्मचारी वर्गावर कारवाई झाली. कधी बस आहे तर कर्मचारी नाही, बस रस्तावर चालेल याचा भरोसा नाही, शहरातील होणारी वाहतूक कोंडी, कार्यशाळा अधिकारी, नियोजन करणारे अधिकारी, आणि कर्मचारी संघटना पदाधिकारी यांच्या मधील बेशिस्तपणा आणि आडमुठे धोरण आणि घसरत असलेले उपन्न यात केडीएमटी चालवायची कशी? पालिका अनुदान ही देते मात्र ते ही तुटपुंजे
पडते. कारण एकीकडे उपन्न कमी होत आहे. जर या बेशिस्त आणि राजकारणावर वेळीच आळा घातला नाही. तर केडीएमटीला टाळे मारावे लागेल अशी भीती सभापती सुभाष म्हस्के यांनी यावेळी व्यक्त केली. 

दरम्यान या 6 जागेवर पुन्हा वर्णी लागावी यासाठी आजी माजी परिवहन समिती सदस्य आणि कार्यकर्त्यांची चढाओढ सुरू झाली असून कुणाचा नंबर लागतो याकडे लक्ष्य लागले आहे.

Web Title: It is necessary to stop the politics of municipal transport program