कलेला धर्माचा चष्मा लावणे योग्य नाही; नवाब मलिकांची टीका

सकाळ न्यूज नेटवर्क 
Monday, 30 November 2020

देशात कलेला आणि अभिनयाला धर्माचा चष्मा लावणे योग्य नाही; मात्र भाजपला धर्माचा चष्मा लावल्याशिवाय जमत नाही, अशी जोरदार टीका नवाब मलिक यांनी केली आहे. 

मुंबई : देशात कलेला आणि अभिनयाला धर्माचा चष्मा लावणे योग्य नाही; मात्र भाजपला धर्माचा चष्मा लावल्याशिवाय जमत नाही, अशी जोरदार टिका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. 

हेही वाचा - रायगडच्या जिल्हा रुग्णालयातील लिफ्ट तब्बल सात वर्षांनंतर सुरू; सामाजिक संस्थांचा पाठपुरावा

शिवसेनेने अजान स्पर्धा आयोजित केली आहे. त्या स्पर्धेला भाजपाने आक्षेप घेतला असून या आक्षेपाला नवाब मलिक यांनी आपल्या भाषेत उत्तर दिले आहे. 

शिवसेनेने अजान स्पर्धा सुरू केली असून या स्पर्धेला भाजपने आक्षेप घेतला आहे. मात्र सोलापूर व इतर जिल्हयात घेण्यात आलेल्या गीतापठण कार्यक्रमात मुस्लिम मुलींनी पहिला क्रमांक पटकावला होता. ही सत्य परिस्थिती आहे याची आठवणही नवाब मलिक यांनी भाजपला करुन दिली आहे. 

हेही वाचा - भाईंदरमध्ये राजकीय बदलाचे संकेत; भाजपमधून राष्ट्रवादीत इनकमिंग वाढणार

दिलीप कुमार, शाहरुख खान, सलमान खान यांनी सिनेमामध्ये अनेक भूमिका केल्या आहेत. शिवाय मंदिरामध्ये सीनही केले आहेत याचा अर्थ त्यांनी धर्मांतर केले आहे असे होत नाही असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. 

It is not right to wear the spectacle of religion Criticism of Nawab Malik 

-----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: It is not right to wear the spectacle of religion Criticism of Nawab Malik