Yashwant jadhav IT Raid | सलग चार दिवस IT ची चौकशी, यामिनी जाधवांची प्रकृती खालावली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kirit Somaiya and Yashwant jadhav

सलग चार दिवस IT ची चौकशी, यामिनी जाधवांची प्रकृती खालावली

बृहन्मुंबई मनपाचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या मालमत्तांवर आयकर विभागाने छापे टाकले. मागील चार दिवसांपासून जाधव यांच्या संपत्तीशी निगडीत कागदपत्रांची चौकशी करण्यात आली आहे. सलग ७२ तास सुरू असणाऱ्या या कारवाई दरम्यान जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव यांची प्रकृती खालावल्याचं समोर आलं आहे.

हेही वाचा: यशवंत जाधवांच्या घरातून 2 कोटींसह 10 बॅक लॅाकर्स जप्त

चार दिवसांपूर्वी शिवसेना नेते यशवंत जाधवांच्या घरावर आयटी विभागाचे छापे पडले. आधी नवाब मलिक यांच्यावर ईडीची कारवाई आणि आता जाधव यांच्यावर आयटीचे छापे यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. आता महाविकास आघाडीतील नेत्यांवर झालेल्या या कारवाईमुळे आरोपप्रत्यारोप पहायला मिळत आहेत. दरम्यान, यशवंत जाधव यांच्या अडचणींत वाढ सुरुच आहे. चौथ्या दिवशी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून यशवंत जाधव यांच्या घरी चौकशी सुरू होती. अखेर काही वेळापूर्वी कागदपत्र आणि अन्य महत्वाची माहिती घेऊन सरकारी अधिकारी बाहेर पडले.

कोण आहेत यशवंत जाधव?

यशवंत जाधव हे सलग चार वेळा मुंबई पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या पत्नी यामिनी जाधव आमदार आहेत. हाही एक राजकीय विक्रम मानला जातो. शिवसेनेत कार्यकर्ता म्हणून राजकारणाला सुरुवात केल्यानंतर जाधव १९९७ मध्ये पहिल्यांदा, त्यानंतर २००७ मध्ये दुसऱ्यांना नगरसेवक म्हणून निवडून आले. २००८ मध्ये त्यांना सलग दोन वर्षे उद्यान आणि बाजार समितीचे अध्यक्षपद मिळाले.

२०१२ च्या निवडणुकीत त्यांच्या पत्नी यामिनी जाधव या निवडून आल्या. मात्र, जाधव यांचा पराभव झाला. यामिनी महापौरपदाच्या स्पर्धेत होत्या. मात्र, त्यांना संधी नाकारण्यात आली. २०१९च्या निवडणुकीत यामिनी जाधव भायखळा मतदारसंघातून निवडून आल्या; तर २०१७ मध्ये यशवंत जाधव तिसऱ्यांदा नगरसेवक झाले. पहिल्या वर्षी त्यांना शिवसेनेने सभागृह नेतेपद दिले. नंतर २०१८ पासून सलग चार वर्षे ते स्थायी समिती अध्यक्ष आहेत. माझगाव ताडवाडी परिसरात सफाई कामगाराच्या कुटुंबात यशवंत जाधव यांचा जन्म झाला.

Web Title: It Raid On Bmc Standing Committee President Yashwant Jadhav And Yamini Jadhav House

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Income Tax Department
go to top