'प्राथमिकच्या शिक्षकांना डावलणे ही योग्य बाब आहे का'? प्रविण दरेकर यांचा सवाल

'प्राथमिकच्या शिक्षकांना डावलणे ही योग्य बाब आहे का'? प्रविण दरेकर यांचा सवाल

मुंबई - शिक्षकांना त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी उन्हात आंदोलन करावे लागत आहे. यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कोणतीच असू शकत नाही. शिक्षकांना न्याय मिळाला नाही तर त्यांच्यासोबतच विरोधी पक्षनेता म्हणून आंदोलनात सहभागी होईन, असा इशारा विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी मंगळवारी येथे दिला. 

राज्यातील विनाअनुदानित, अंशतः अनुदानित शाळांना शासनाने अनुदान देण्याचा निणर्य घेतला आहे. मात्र शासनाने घोषित केलेल्या 20 टक्के वाढीव अनुदानाची अंमलबजावणी होत नाही. यासंदर्भात सर्व शिक्षक संघटनांतर्फे आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. दरेकर यांनी आझाद मैदानात जाऊन आंदोलकांची भेट दिली. 

देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात शिक्षकांना मंजूर झालेल्या अनुदानाची लगेच अंमलबजावणी झाली. पण आताच्या सरकारला शिक्षकांच्या मागण्यांसाठी वेळ नाही. बिल्डरांचा प्रीमियर माफ करायला आणि दारू दुकानांच्या परवान्यांचे पैसे माफ करायला या सरकारला वेळ आहे, अशी टीका दरेकर यांनी केली. 

----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Is it right to dismiss primary school teachers ask by Pravin Darekar

-

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com