'आयटीआय'कडे कल वाढला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

मुंबई - राज्यातील सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) प्रवेशांसाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानुसार राज्यभरातील शासकीय आयटीआयमध्ये 91 हजार 117 विद्यार्थ्यांनी विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे चार टक्‍क्‍यांहून अधिक विद्यार्थ्यांनी आयटीआयला पसंती दिली आहे.

राज्यभरातील सरकारी आयटीआयमध्ये प्रवेशासाठी यंदा 94 हजार 248 जागा होत्या. त्यासाठी झालेल्या प्रवेशाच्या चार फेऱ्यांतून 91 हजार 117 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्‍चित केला आहे. जागांच्या तुलनेत यंदा शासकीय आयटीआयमध्ये 96.68 टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. गतवर्षी 92.43 टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता.

खासगी आयटीआयमध्ये 44,069 जागा
खासगी आयटीआयमध्ये 44,069 जागा आहेत. यामधील जागा संस्था स्तरावर भरण्याची प्रक्रिया 31 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. खासगी संस्थांमधील जागाही मोठ्या प्रमाणात भरण्यात येणार आहेत. त्यामुळे आयटीआयमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लाखांवर पोचण्याची शक्‍यता आहे.

Web Title: ITI Admission Education Student

टॅग्स