esakal | मुंबई परिसरात 'ITI' मध्ये प्रवेश घेण्यासाठी विशेष मोहीम, वाचा सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

 ITI

मुंबई परिसरात 'ITI' मध्ये प्रवेश घेण्यासाठी विशेष मोहीम, वाचा सविस्तर

sakal_logo
By
संजीव भागवत

मुंबई : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अंतर्गत येणाऱ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) मधील प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रिया (admission process) सुरू आहे. यात मुंबईत असलेल्या शासकीय आयटीआयमध्ये (government ITI) ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांनी सर्वाधिक प्रवेश घ्यावेत असे आवाहन केले जात आहे. मुंबई, ठाणे परिसरात असलेल्या सरकारी, खासगी आस्थापनेत मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण आणि त्यातून शुल्क प्रतिपूर्तीचा लाभ मिळणार (fees facility) असल्याने या प्रवेशासाठी एक विशेष मोहीम (special campaign) सुरू करण्यात आली आहे.

मुंबई आणि परिसरात 13 शासकीय आणि 14हून अधिक खाजगी संस्थाकडून चालविण्यात येणाऱ्या आयटीआय कार्यरत आहेत. यामध्ये सुमारे 4 हजाराहून अधिक जागा उपलब्ध आहेत. आयटीआय प्रवेशासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थी आपल्या जिल्ह्यात असलेल्या संस्थांना प्राध्यान्य देत असल्याने शहरी भागातील जागांवर प्रवेश कमी होतात, त्यामुळे मुंबई असलेल्या शासकीय आयटीआयमधील प्रवेशातून होणारे फायदे विद्यार्थ्यांच्या लक्षात यावेत यासाठी विभागाकडून येथे उपलब्ध असलेल्या जागांची माहिती, त्यासाठी प्रवर्गनिहाय जागा, प्रवेश शुल्क उपलब्ध सोयीसुविधा आदींची प्रसिद्ध केली जात आहे.

हेही वाचा: मुंबईत डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोका, खबरदारी घेण्याच्या 'BMC'ला सूचना

मुंबई, ठाणे या परिसरात विद्यार्थ्याना प्रवेश घेतलयानंतर मिळणाऱ्या रोजगाराच्या तसेच प्रशिक्षणाच्या संधीचीही माहिती दिली जात आहे. विशेषत: मुंबई आणि परिसरात बेस्ट, एसटी, रेल्वे, यासोबत केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध संस्थांमध्ये रोजगार आणि प्रशिक्षणाच्या संधी आयटीआय करणाऱ्या विद्यार्थ्याना उपलब्ध होणार आहेत, शिवाय संचालनालयाने नुकतेच आयटीआय करताना खासगी आस्थापनेत प्रशिक्षण आणि त्यासाठीच्या शुल्क प्रतिपूर्तीची अत्यंत महत्वांकाशी योजना सुरू केली असल्याने त्याचे सर्वाधिक लाभ हे मुंबई आणि परिसरात आयटीआयचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याना होणार असल्याने यासाठी विद्यार्थ्यांनी या परिसरात प्रवेश घ्यावा असे आवाहन संचालनालयाकडून केले जात आहे.

राज्यात एकूण 549 खाजगी आयटीआय आहेत. ज्यात प्रत्येक तालुक्यात किमान 01 शासकीय आयटीआय सुरु करण्यात आले आहे. त्यानुसार 358 तालुक्यात 417 शासकीय आयटीआय आहेत. त्यामध्ये आदिवासी भागात आदिवासींसाठी 61 संस्था, अनुसूचित जाती व नवबौध्दांच्या मुलामुलींसाठी 04 उच्चस्तर संस्था, अल्पसंख्याकांसाठी स्वतंत्र 02 संस्था व 43 शासकीय आयटीआमध्ये स्वतंत्र तुकड्या, महिलांसाठी 15 तर 28 आदिवासी आश्रमशाळा आयटीआय अशा संस्थांचा समावेश आहे.

loading image
go to top