दहशत निर्माण करण्यासाठी डे यांची हत्या 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

मुंबई - प्रसिद्धिमाध्यमांबरोबरच सर्वसामान्य जनतेमध्ये दहशत निर्माण व्हावी आणि आपली टोळी सक्रिय आहे, हे दाखविण्यासाठी गुंड छोटा राजनने ज्येष्ठ पत्रकार ज्योतिर्मय ऊर्फ जे डे यांची हत्या घडवून आणली, असा निष्कर्ष विशेष मोक्का न्यायालयाने या हत्याकांडाच्या खटल्याच्या निकालपत्रात मांडला आहे.

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि छोटा राजनमधील वैर तसेच डे यांच्या बातम्यांमुळे छोटा राजनला डे यांच्याबाबत संशय होता. दाऊदच्या तुलनेत डे राजनला कमी महत्त्व देतात, आपली माहिती ते दाऊद टोळीला देतात, अशी भीती छोटा राजनला वाटत असे. संशय नेहमीच वाईट असतो. तो गुन्हेगारी जगतातील असल्यास अधिक भीतिदायक ठरतो. कारण ज्याच्याबद्दल संशय असतो त्याच्याविरोधात गुंड कोणत्याही पद्धतीची कारवाई करत असतात. डे त्याचेच बळी ठरले, असे न्यायालयाने निकालपत्रात नमूद केले आहे. 

Web Title: j d murder case to create terror