नवीन महाराष्ट्र घडविण्यासाठी जन आशीर्वाद यात्रा ः आदित्य ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

"विधानसभा निवडणूक तोंडावर आली म्हणून मते मागण्यासाठी जन आशीर्वाद यात्रा काढलेली नाही, तर लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या खासदारांना मतदान केलेल्या मतदारांचे आभार मानण्यासाठी आणि दुष्काळमुक्त, बेरोजगारी मुक्त, कर्जमुक्त, सुजलाम्‌ सुफलाम नवीन महाराष्ट्र घडविण्यासाठी काढली आहे', असे प्रतिपादन शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी नवी मुंबई येथे केले. 

वाशी: "विधानसभा निवडणूक तोंडावर आली म्हणून मते मागण्यासाठी जन आशीर्वाद यात्रा काढलेली नाही, तर लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या खासदारांना मतदान केलेल्या मतदारांचे आभार मानण्यासाठी आणि दुष्काळमुक्त, बेरोजगारी मुक्त, कर्जमुक्त, सुजलाम्‌ सुफलाम नवीन महाराष्ट्र घडविण्यासाठी काढली आहे', असे प्रतिपादन शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी नवी मुंबई येथे केले. 

जन आशीर्वाद यात्रेनिमित्ताने वाशी येथील सिडको एक्‍झीबिशन सेंटरमध्ये विजय संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, जनआशीर्वाद यात्रे दरम्यान मी जनतेच्या आडीआडचणी समजावून घेतल्या. निवेदन स्विकारली. त्यामुळे माझ्या दृष्टीने ही यात्रा तिर्थयात्रा झाली आहे. शिवसेनेच्या शाखा प्रत्येक गल्लीत आणि प्रत्येक गावात आहेत. या शाखेमधून शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आणि शिवसैनिक सर्वसामान्य नागरिकांच्या आडचणी सोडवत असतात. शाखेत येणाऱ्या नागरिकाची जात, धर्म, त्याने कुणाला मतदान केले. हे ते विचारत नाहीत. फक्त त्याला अडचणीतून बाहेर काढणे हेच ध्येय त्यांचे असते. या शिवसैनिकांना सलाम करण्यासाठी मी आज महाराष्ट्रात फिरतो आहे. या यात्रेदरम्यान मला जे प्रेम मिळते आहे, ते मी ऍक्‍टर म्हणून नाही किंवा दिसायला सुंदर म्हणून नाही, तर तुम्ही सर्वजण जी जनतेची सेवा करता, त्याची ही पोहच पावती आहे. ज्यांनी आपल्याला मते दिली आणि ज्यांनी नाही दिली, त्यांना सर्वांना बरोबर घेऊन आपल्याला नवीन महाराष्ट्राची निर्मिती करायची आहे, असेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jana Aashirwad Yatra to create a new Maharashtra: Aditya Thackeray