जंजिरा किल्ला आठवडाभर बंद; पर्यटकांचा हिरमोड

जंजिरा किल्ला आठवडाभर बंद; पर्यटकांचा हिरमोड


अलिबाग : प्रसिद्ध जंजिरा किल्ला आजपासून 2 जानेवारीपर्यंत पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जारी केले आहेत. कोरोनामुळे जंजिरा किल्ल्यावर होणारी गर्दी लक्षात घेता हे पाऊल उचलण्यात आले आहे. 

नाताळची सुटी, शनिवार, रविवार या सलग सुट्या आणि थर्टी फर्स्ट, नववर्ष स्वागत या पार्श्‍वभूमीवर रायगडात पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. अलिबाग, मुरूड, श्रीवर्धनमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होण्याची शक्‍यता आहे. जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी मुरूड येथील जंजिरा किल्ला नेहमीच आकर्षण राहिला आहे. अशा परिस्थितीत जंजिरा किल्ल्यावर पर्यटकांची गर्दी होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने तसेच गर्दी झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, याकरिता जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी बंद ठेवण्याबाबतचा अहवाल पोलिस अधीक्षकांनी सादर केला होता. दरम्यान, या आदेशाचे उल्लंघन केल्यास फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. 

Janjira fort closed for a week disappoint of tourists

----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com