esakal | जंजिरा किल्ला अखेर खुला पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

जंजिरा किल्ला अखेर खुला पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुरुड : दुसऱ्या लाटेत कोरोना (Corona) संसर्ग वाढू लागल्याने जिल्हाधिकारी व भारतीय व पुरातत्त्व संशोधन विभागाने १४ एप्रिल २०२१ पासून जंजिरा किल्ल्यात प्रवेशबंदी केली होती. ही बंदी शनिवार पासून मागे घेण्यात आली. या निर्णयामुळे मुरूड तालुक्याच्या पर्यटन व्यवसाला पुन्हा चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

जंजिरा किल्ला हा पर्यटकांसह इतिहासप्रेमी अभ्यासकांच्या अधिक पसंतीचे ठिकाण आहे. किल्ल्याचे गतवैभव दर्शवणारा राजमहाल, दोन गोड्या पाण्यातील तळी, गोड्या पाण्याची विहीर, पंचधातूंनी मढवलेली कलाल बांगडी तोफ, भुयारी मार्ग, तोफखाना व खुष्कीचा दरवाजा आदी पाहण्यासाठी मोठ्या संख्येन येतात.

हेही वाचा: कोविडमुळे ओपन हार्ट शस्त्रक्रियांत घट

कोविडमुळे तो १४ एप्रिल २०२१ पासून बंद आहे. जिल्हाधिकारी व भारतीय पुरातत्त्व संशोधन विभागाने कमी होत असल्याने तो उघडण्यात आला आहे. कोरोना नियमांचे" पालन करत जंजिरा किल्ल्यात सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच यादरम्यान बोटधारकांना पर्यटकांना घेऊन जाण्यास परवानगी आहे.

- बी. जी. येलीकर, सहायक संवर्धक, पुरातत्त्व संशोधन विभाग

loading image
go to top