जतिन कदम यांनी उंचावली पालघर जिल्ह्याची मान

प्रमोद पाटील
गुरुवार, 12 एप्रिल 2018

सफाळे : लोकसंगीतातून लोकशिक्षण या पालघर जिल्हयातील प्रकल्पाला राज्यात प्रथम क्रमांक मिळाला असून शैक्षणिक क्षेत्रात पालघर जिल्हयाचे नाव उंचावले आहे. 

सफाळे : लोकसंगीतातून लोकशिक्षण या पालघर जिल्हयातील प्रकल्पाला राज्यात प्रथम क्रमांक मिळाला असून शैक्षणिक क्षेत्रात पालघर जिल्हयाचे नाव उंचावले आहे. 

43 वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन,शासकीय योजनांची जत्रा व कृषी मेळावा चाळीसगाव, जि.जळगाव येथे मंगळवारी (ता.10) संपन्न झाला.संपूर्ण राज्यभरातून विद्यार्थी व शिक्षकांच्या  प्राथमिक व माध्यमिक गटातून एकूण 439 प्रकल्पांची मांडणी करण्यात आली होती.या प्रदर्शनात सफाळयातील राजगुरू ह.म.पंडित विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक  जतिन रमेश कदम यांनी लोकसंख्याशिक्षण विभागातून मांडलेल्या प्रकल्पास संपूर्ण राज्यातून प्रथम क्रमांकाने सन्मानित करण्यात आले.

या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या सांगता समारोपाला खासदार ए.टी.पाटील व स्थानिक आमदार उन्मेष पाटील उपस्थित होते.

जतिन कदम हे एक उपक्रमशील शिक्षक असून त्यांनी मांडलेला लोकसंगीतातून लोकसंख्याशिक्षण हा प्रकल्प उत्कृष्ट सादरीकरणामुळे चाळीसगाव व परिसरातील नागरिकांना अत्यंत भावला.परीक्षकांच्या प्रथम पसंतीस उतरलेला हा प्रकल्प संपूर्ण प्रदर्शनात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला होता.विविध संगीत साहित्याची सुयोग्य मांडणी,विषय मांडण्याची सोपी पद्धत,प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचे तंत्र, विषयाचे गांभीर्य व महत्त्व यामुळे प्रकल्पाचे संपूर्ण विज्ञान प्रदर्शनात कौतुक करण्यात येत होते.

समारोप कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना जतिन कदम यांनी चाळीसगावकरांच्या आपुलकी आणि स्नेहपूर्वक वागणूक याबद्दल कृतज्ञतापूर्वक मनोगत व्यक्त करून पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे खास आभार मानले.

पालघर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व जतिन कदम हे करीत असताना राज्यात प्रथम क्रमांकाने सन्मानित होण्यामागे माध्यमिक विभागाचे  शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ व प्राथमिक विभागाच्या  शिक्षणाधिकारी संगीता भागवत यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल पालघर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष डॅरेल डिमेलो, ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष यशवंत घरत, सचिव दिपक भाते यांनी तसेच 

संपूर्ण राज्यभरातून कौतुकाचा वर्षाव होत असून पालघर जिल्ह्याच्या शैक्षणिक वाटचालीत अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Web Title: jatin kadam come first in loksangitatun lokshikshan