esakal | जयंत पाटलांनी देवेंद्र फडणवीसांना सुनावलं, "थिल्लरपणा करू नये" कमेंटवर दिलं रोखठोक उत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

जयंत पाटलांनी देवेंद्र फडणवीसांना सुनावलं, "थिल्लरपणा करू नये" कमेंटवर दिलं रोखठोक उत्तर

परतीच्या पावसानंतर झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी राज्यातील सर्वच महत्त्वाचे नेते शेतकऱ्यांच्या बांधावर जाताना पाहायला मिळतायत.

जयंत पाटलांनी देवेंद्र फडणवीसांना सुनावलं, "थिल्लरपणा करू नये" कमेंटवर दिलं रोखठोक उत्तर

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई :  मान्सूनच्या परतीच्या प्रवासावेळी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा हाहा:कार पाहायला मिळाला. जे भाग पर्जन्यछायेमध्ये येतात त्या भागांमध्ये देखील तुफान पाऊस पडला. यंदा पाऊस चांगला झाल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साह होता, मात्र परतीच्या पावसाने शेतमालासह अनेक भागांमध्ये थेट शेत जमिनीच वाहून नेल्यात.

परतीच्या पावसानंतर झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी राज्यातील सर्वच महत्त्वाचे नेते शेतकऱ्यांच्या बांधावर जाताना पाहायला मिळतायत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महाराष्ट्रातील सर्वात जेष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस सर्वच परतीच्या पावसाने नुकसान केलेल्या भागांचा दौरा करतायत. दरम्यान या दौऱ्यावेळी राजकारण अजिबात कमी झालेलं नाही. काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांवर टीका केल्याचं पाहायला मिळालं. 

महत्त्वाची बातमी : मास्क किंमती नियंत्रण प्रस्ताव धूळखात, राज्य सरकारला अहवाल सादर

देवेंद्र फडणवीस यांनी "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थिल्लरपणा करू नये" या तिखट शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांवर टीका केलेली. ज्यावर महाराष्ट्राचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना खडेबोल सुनावलेत. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला जयंत पाटलांनी जशास तसे उत्तर दिले आहे.

काय म्हणालेत जयंत पाटील : 

देवेंद्र फडणवीसांकडे आता बोलण्यासारखं काही राहिलेलं नाही. मुख्यमंत्र्यांविषयी विधान करताना जे शब्द फडणवीसांनी वापरलेत ते चुकीचे आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी संकटाचा सामना करताना कायम समजूतदारपणा दाखवला आहे. फडणवीसांकडे कोणताही मुद्दा राहिलेला नाही, म्हणून ते अशी विधानं करत आहेत. महाविकास आघाडी सरकार अगदी सक्षमपणे काम करत आहे. त्यामुळे सरकारच्या नाकर्तेपणाचा अजिबात प्रश्न उद्भवत नाही. 

महत्त्वाची बातमी :  ठाण्यातील कोव्हिड रुग्णालयात अर्धशिक्षित डॉक्टरांमुळे अनेक रुग्णांचा जीव गेल्याची भीती

कोल्हापूर पुराची करून दिली आठवण : 

गेल्यावर्षी कोल्हापुरात पूर आलेला तेंव्हा सरकारने कोणतीही मदत दिली नव्हती, शेवटी नागरिक एकमेकांसाठी धावून गेलेत. लोकांनी एकमेकांना मदत केली. नंतर शेवटच्या दोन तीन दिवसांमध्ये सरकारकडून मदत आलेली, याची जयंत पाटलांनी फडणवीसांना आठवण करून दिली. 

jayant patil retaliates to the comment done by devendra fadanavis on uddhav thackeray

loading image
go to top