जयश्री टी यांना राजमुद्रा जीवनगौरव

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 डिसेंबर 2016

मुंबई - ज्येष्ठ अभिनेत्री जयत्री टी यांना राजमुद्रा कला अकादमीने जीवनगौरव पुरस्कार जाहीर केला आहे. लावण्यवतींच्या भन्नाट नृत्यांनी 10 वर्षे रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या "गुलजार गुलछडी' या लावणी कार्यक्रमाचा तेराशेवा प्रयोगही या वेळी होणार आहे. प्रभादेवीतील रवींद्र नाट्य मंदिरात रविवारी (ता. 18) सायंकाळी हा प्रयोग रंगणार आहे.

जयश्री टी या आपल्या नृत्य आणि अभिनय शैलीमुळे फक्त मराठी चित्रपटसृष्टीपुरत्याच मर्यादित राहिलेल्या नाहीत. त्यांनी हिंदीबरोबरच गुजराती रंगमंच आणि चित्रपटविश्‍वही गाजवले. या सोहळ्यात लावण्यतारका सीमा पोटे-नारायणगावकर आणि चित्रपट निर्माते मेघराज राजेभोसले यांचाही गौरव करण्यात येणार आहे.

Web Title: jeevangaurav award to jayshree t