जेट एअरवेजची विमान सेवा सुरळित 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

मुंबई - जेट एअरवेजच्या वरिष्ठ वैमानिकांनी रविवारी (ता. 2) अघोषित काम बंद केल्यामुळे मुंबईहून वेगवेगळ्या भागांत जाणारी 14 उड्डाणे रद्द करण्यात आली होती. त्यामुळे हजारो प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. जेट एअरवेजची सेवा सोमवारी मात्र सुरळीत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

आर्थिक तोट्यात असलेल्या जेट एअरवेज कंपनीने दोन महिन्यांपासून वेतन दिले नसल्यामुळे वैमानिकांत नाराजी आहे. वैमानिकांनी आजाराचे कारण देत रविवारी सामूहिक रजा घेत अघोषित काम बंद आंदोलन केले. त्यामुळे कंपनीला कोट्यवधींचा फटका बसला. प्रवाशांना ऐनवेळी दुसऱ्या विमान कंपनीच्या तिकिटांसाठी धावपळ करावी लागली. महत्त्वाच्या कामांसाठी जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली. त्यानंतर सोमवारी जेट एअरवेजची विमान सेवा सुरळीत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

एनएजीचा संपाला विरोध 
नॅशनल एव्हिएटर्स गिल्डने (एनएजी) जेट एअरवेजच्या वैमानिकांनी केलेल्या अघोषित काम बंद आंदोलनाला विरोध दर्शवला आहे. अचानक रजेवर जाणाऱ्या वैमानिकांशी संस्थेचा संबंध नसल्याचे एनएजीचे उपाध्यक्ष असीम वलियानी यांनी स्पष्ट केले. त्यामुळे नाराज झालेले वैमानिक दोन दिवसांत बैठक घेऊन भूमिका स्पष्ट करतील असे सांगण्यात आले. 

Web Title: Jet Airways plane service is start