अभिनेत्याऐवजी बनला दागिने चोर

अभिनेत्याऐवजी बनला दागिने चोर

मुंबई - लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांमध्ये सोनसाखळी चोरणाऱ्या मोहम्मद सैफ असगरअली चौधरी या तरुणाला रेल्वे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. अभिनेता बनण्यासाठी उत्तर प्रदेशातून मुंबईत आलो; मात्र अपयश आल्यामुळे गुन्हेगारीकडे वळलो, अशी कबुली त्याने दिली.  

उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील रहिवासी असलेला मोहमद सैफ असगरअली चौधरी तीन वर्षांपासून मुंबईत धारावी येथे भाड्याच्या घरात राहून सोनसाखळ्या चोरण्याचे गुन्हे करत होता. कोकणातून रात्री आणि पहाटे येणाऱ्या मेल-एक्‍स्प्रेस गाड्यांमध्ये दारात बसलेल्या प्रवाशांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने खेचून तो पलायन करत होता. मुंबईत एक महिना चोऱ्या केल्यानंतर तो पनवेल येथील सोने गाळण्याचे काम करणाऱ्या साबीर शेख याला दागिने विकत असे. दागिने विक्रीतून मिळालेली रक्कम घेऊन तो गावाकडे परत जात असे. त्यानंतर पुन्हा मुंबईत येऊन चोऱ्या करत असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले. 

पोलिसांनी दोन महिने पाळत ठेवून त्याच्या मुसक्‍या बांधल्या. त्याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी साबीर शेखलाही अटक केली. मॉडेलिंग करण्यासाठी आणि ‘फिल्मस्टार’ बनण्यासाठी आपण मुंबईत आलो होतो. परंतु, यश न आल्यामुळे गुन्हेगारी क्षेत्राकडे वळलो, असे त्याने पोलिसांना सांगितले. कुर्ला रेल्वे पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com