नाईकची 18.37 कोटींची मालमत्ता जप्त

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मार्च 2017

मुंबई - वादग्रस्त धर्मप्रसारक झाकीर नाईक भोवतालचे फास आवळण्यास केंद्रीय यंत्रणांनी सुरुवात केली आहे. सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) सुमारे 18.37 कोटी रुपयांची मालमत्ता ताब्यात घेतली. दरम्यान, राष्ट्रीय तपास पथकानेही (एनआयए) नाईकला नव्याने समन्स पाठवला असून त्यानुसार 30 मार्चला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.

आयआरएफ संस्था व इतर आरोपींशी संबंधित मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. त्यात चेन्नईतील पीस एज्युकेशनल फाऊंडेशनच्या शाळेची एक इमारत, मुंबईतील एक गोदाम, म्युच्युअल फंड व बॅंकमधील शिल्लक अशा एकूण 18.37 कोटी रुपयांची मालमत्ता ताब्यात घेण्यात आल्याचे ईडीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. वादग्रस्त विधानांच्या जोरावर नाईकच्या आरआरएफ संस्थेला परदेशातून शेकडो कोटी रुपयांच्या देणग्या आल्या. त्यातील सुमारे 200 कोटी रुपयांची मालमत्ता ईडीच्या रडावर असून ती बेनामी असल्याचा संशय ईडीला आहे.

याशिवाय एनआयएनेही झाकीर नाईकला चौकशीसाठी उपस्थित राहण्याबाबत समन्स बजावले आहे. 30 मार्चला दिल्लीतील एनआयएच्या कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहण्याबाबत सांगितले आहे. यापूर्वीही एनआयए व ईडी दोनही संस्थांनी झाकीर नाईकला समन्स बजावले होते, पण तो चौकशीसाठी हजर राहिला नाही. त्याने व्हिडीओ कॉन्फरन्सिगमार्फत चौकशीस उपस्थित राहण्यास तयारी दर्शवली होती. त्याला यंत्रणांनी नकार दिला होता.

Web Title: jhakir naik property seized